माहितीच्या अधिकारातंर्गत माहिती देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:31 IST2021-04-09T04:31:41+5:302021-04-09T04:31:41+5:30
गोंदिया : तालुक्यातील पिंडकेपार येथील ग्रामपंचायतमध्ये कुठलीही निविदा न काढता कर्मचाऱ्याची भरती करण्यात आली. त्यामुळे ही भरती ग्रामपंचायतने कुठल्या ...

माहितीच्या अधिकारातंर्गत माहिती देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ
गोंदिया : तालुक्यातील पिंडकेपार येथील ग्रामपंचायतमध्ये कुठलीही निविदा न काढता कर्मचाऱ्याची भरती करण्यात आली. त्यामुळे ही भरती ग्रामपंचायतने कुठल्या आधारावर केली याची माहिती तक्रारकर्त्याने ग्रामपंचायतकडे माहितीचा अधिकारातंर्गत अर्ज करुन मागविली पण ग्रामसेवकांने ती माहिती देण्यास टाळटाळ करीत असल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला. तसेच माहिती न देणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीतून केली आहे.
पिंडकेपार ग्रामपंचायतमध्ये ऑपरेटर पदासाठी जागा काढण्यात आली. मात्र ग्रामपंचायतने त्या ऐवजी चपराश्याचे पद भरल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. विना परीक्षा घेता व निविदा न काढता ग्रामपंचायतने हे पद कसे भरले असा सवाल तक्रारकर्त्याना केला आहे. तसेच यासंपूर्ण प्रक्रियेची माहिती देण्यात यावी यासाठी माहितीच्या अधिकारांतर्गत ग्रामपंचायतकडे अर्ज केला. पण सहा महिन्याचा कालावधी लोटूनही ग्रामसेवक माहिती देण्यास टाळटाळ करीत असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांना केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी तक्रारकर्त्यांने केली आहे.