शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींना दिवाळखोरीचे ग्रहण!

By admin | Updated: October 28, 2015 02:01 IST

गावाच्या विकासाचा आत्मा म्हणून ग्रामपंचायतींकडे पाहिले जाते. मात्र आत्म्याचा आत्माच शासनाच्या त्या परिपत्रकाने हिरावून घेतला आहे.

युवराज गोमासे ल्ल करडी (पालोरा)गावाच्या विकासाचा आत्मा म्हणून ग्रामपंचायतींकडे पाहिले जाते. मात्र आत्म्याचा आत्माच शासनाच्या त्या परिपत्रकाने हिरावून घेतला आहे. एप्रिल २०१५ पासून ग्रामपंचायतींची घरघर वसुली बंद आहे. नव्हे शासनाकडेच बंद केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये पैशाचा ठणठणाट असून ग्रामपंचायती दिवाळखोरीच्या वाटेवर आहेत. पाणीपुरवठा योजना, वीज बिले, कर्मचाऱ्यांचे वेतन, स्ट्रीट लाईट व अन्य विकास कामे अडचणीत सापडली आहेत. शासन व सत्ता पक्षाचे पदाधिकारी मात्र अच्छे दिन आल्याचे नारे लावण्यात व्यस्त आहेत.भंडारा जिल्ह्यात ८७८ गावे असून ७९८ गावे आबादी तर ८० गावे रिठी आहेत. एकूण ५४० ग्रामपंचायती असून १ ग्राममंडळाचा समावेश आहेत. जिल्ह्यातील या ग्रामपंचायती शासनाच्या त्या आदेशाने कमालीच्या त्रस्त आहेत. दिवाळीचा सण समोर असताना ग्रामपंचायतींकडे ग्रामस्वच्छतेसाठी सुद्धा पैसे नाहीत. शासकीय इमारतींची रंगरंगोटी, नाली, गटारे यांची साफसफाई व देखभाल दुरुस्तीची कामे अडचणीत आहेत. विकास कामांचा तर पत्ताच नाही. सुरु असलेली कामे अपुर्णावस्थेत बंद पडली आहेत. नवीन कामांसाठी निधी नाही. कधी नव्हे इतकी बिकट अवस्था ग्रामपंचायतींची त्या परिपत्रकामुळे झाली आहे. एप्रिल २०१५ पासून ग्रामपंचायतींची घरघर वसुली बंद आहे. त्यावेळेपासूनचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन अडून आहेत. दिवाळीचा बोनस कर्मचाऱ्यांना देण्याची ऐपत सुद्धा ग्रामपंचायतींची राहिलेली नाही. पिण्याच्या पाण्याच्या योजना वीज बिल थकीत झाल्याने खंडीत होण्याच्या मार्गावर आहेत. पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर करणे बऱ्याचशा ग्राम पंचायतींनी बंद केल्याने अशुद्ध पाणी पिण्यास नागरिक त्रस्त आहेत. विद्युत लाईट दुरुस्त अवस्थेत आहेत. नाली, गटारे घाणीने तुडूंब भरलेल्या आहेत. अस्वच्छता गावात दिसून येत आहेत.नागरिक या सर्व भानगडींसाठी ग्रामपंचायतींना दोष देत आहेत. मात्र त्याच्याकडे पैसाच नसल्याने उपाययोजना करायच्या तरी कशा? पैसा आणायचा तरी कुठून? जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना याची माहिती असताना सुद्धा ग्रामपंचायतींना अतिरिक्त निधी दिला जात नाही. निधीच्या ठणठणाटाुळे ग्रामपंचायती बेजार असून त्यांना सावरण्यासाठी विशेष पर्यायी व्यवस्था होणे गरजेचे झाले आहे. सध्या तरी मात्र ग्रामपंचायती दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहचल्या आहेत. घरकर वसुली बंद करण्यात आल्याने ग्रामविकासाची कामे रेंगाळत आहेत. याकडे वरिष्ठ पातळीवर दखल घेण्याची गरज आहे.