शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जि.प.वर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

जयस्तंभ चौकातून बुधवारी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरूवात झाली.मोर्चात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चा जि.प.समोर पोहचल्यानंतर शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी दिलेल्या निवेदनातून यावलकर समितीच्या शिफारशीप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करण्यात यावी.

ठळक मुद्देरिक्त पदे भरण्याची मागणी : जि.प.मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात बुधवारी (दि.२९) स्थानिक जयस्तंभ चौकातून जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चा जि.प.कार्यालयासमोर पोहचल्यानंतर कर्मचाऱ्यांनी निर्देश करुन जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आले.जयस्तंभ चौकातून बुधवारी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरूवात झाली.मोर्चात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चा जि.प.समोर पोहचल्यानंतर शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी दिलेल्या निवेदनातून यावलकर समितीच्या शिफारशीप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करण्यात यावी. आकृतीबंधात सुधारणा करुन कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यात समाविष्ट करावे, म्हैसेकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेशंन लागू करावी, बबनराव कुचिक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार किमान वेतन देण्यात यावे. जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदांना मंजुरी देऊन १० टक्के आरक्षणाच्या नियमाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वर्ग ३ व ४ च्या पदावर सामावून घेण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात संघटन सचिव मिलिंद गणविर, चत्रुघन लांजेवार, सुखदेव शहारे, रविंद्र किटे, विष्णू हत्तीमारे, आशिष उरकुडे, सुनील लिल्हारे, महेंद्र भोयर, ईश्वरदास भंडारी, खोजराम दरवडे, बुधराम बोपचे, नरेश कावडे, विनोद शहारे यांचा समावेश होता.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतMorchaमोर्चा