शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

अखेर वजन करून धान्याची पोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 06:00 IST

जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करुन शिक्षण विभागाचे याकडे लक्ष वेधले होते.तसेच ६ डिसेंबर रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथील जि.प.शाळेला पोषण आहाराचा पुरवठा करताना त्याचे वजन न करताच कसे वितरण केले जाते.हा प्रकार सुध्दा उघडकीस आणला होता.

ठळक मुद्देलोकमत बातमीचा परिणाम : शिक्षण विभागाने घेतली दखल, मापातील पाप दूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी शासनाने करार केलेल्या कंत्राटदाराकडून शाळांना अन्नधान्याचा पुरवठा केला होता. मात्र कंत्राटदार अन्न धान्याची पोच शाळांना देताना त्याचे वजन करुन न देता मापात पाप करत होते. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर शिक्षण विभागाने याची गांर्भियाने दखल घेत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे पत्र देताच अन्नधान्याचे पोच देतांना नियमानुसार वजन करुन देण्यास सुरूवात केली आहे. यामुळे अनेक शाळांना सुध्दा दिलासा मिळाला आहे.इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिले जाते. यासाठी तांदूळ आणि इतर साहित्याचा पुरवठा करार केलेल्या संबंधित कंत्राटदाराकडून शाळांना केला जातो. नियमानुसार शाळांना पोषण आहाराचा पुरवठा करतांना त्याचे वजन करुन देणे अनिवार्य आहे. मात्र संबंधित कंत्राटदार या नियमांना धाब्यावर बसवून वजन न करताच पोषण आहाराचा पुरवठा करीत असल्याच्या तक्रारीत सुध्दा वाढ झाली होती.जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करुन शिक्षण विभागाचे याकडे लक्ष वेधले होते.तसेच ६ डिसेंबर रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथील जि.प.शाळेला पोषण आहाराचा पुरवठा करताना त्याचे वजन न करताच कसे वितरण केले जाते.हा प्रकार सुध्दा उघडकीस आणला होता.लोकमतने हा मुद्दा लावून धरला होता. यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी हरी राईस अ‍ॅन्ड अ‍ॅग्रो कंपनी पत्र देऊन वजन करुनच शाळांना पोषण आहाराचा पुरवठ्याचे करण्याचे निर्देश दिले. तसेच पोषण आहाराच्या अन्नधान्याच्या पुरवठा करणाºया गाडीत वजनकाटे सोबत ठेवण्याची नोटीस बजावली होती. अन्यथा कंत्राट रद्द करुन काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता.यानंतर सदर कंपनीने याची गांर्भियाने दखल घेत बुधवारपासून (दि.११) शाळांना पोषण आहाराच्या अन्नधान्याचे वितरण हे वजन करुन देण्यास सुरूवात केली.गाडीसोबत इलेक्ट्रानिक वजनकाटा सोबत ठेवला आहे.शाळांची तक्रार दूरकंत्राटदाराकडून पुरवठा करण्यात येणाºया शालेय पोषण आहाराच्या तांदळाच्या प्रती कट्टयामागे दोन तीन किलो धान्य कमी दिले जाते होते.यामुळे शाळांचे सुध्दा नुकसान होत होते. मात्र आता पोच देताना वजन करुन दिली जात असल्याने कमी धान्य मिळत असल्याची तक्रार सुध्दा दूर झाली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र