गोपालदास अग्रवाल यांनी घेतली अमित शहा यांची सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 05:00 IST2021-03-01T05:00:00+5:302021-03-01T05:00:27+5:30

गोंदिया-भंडारा जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची माहिती देऊन चर्चा केली. माजी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशानंतर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गोंदिया विधानसभा क्षेत्रात २९ पैकी २० ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व स्थापन करीत ऐतिहासिक विजय संपादन केल्याची माहिती दिली. 

Gopaldas Agarwal paid a courtesy call on Amit Shah | गोपालदास अग्रवाल यांनी घेतली अमित शहा यांची सदिच्छा भेट

गोपालदास अग्रवाल यांनी घेतली अमित शहा यांची सदिच्छा भेट

ठळक मुद्देजिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे दिले निर्देश

लाेकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी दिल्ली येथे माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकरिता शुभेच्छा दिल्या. 
यावेळी माजी आ. अग्रवाल यांनी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींची माहिती दिली. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची माहिती देऊन चर्चा केली. माजी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशानंतर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गोंदिया विधानसभा क्षेत्रात २९ पैकी २० ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व स्थापन करीत ऐतिहासिक विजय संपादन केल्याची माहिती दिली. 
कोरोनाकाळातील वीजबिले माफ करण्याचे आश्वासन देणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कसे घूमजाव केले याची माहिती दिली. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गोंदिया जिल्ह्यात भाजपचे पक्षसंघटन अधिक बळकट करून आगामी जिल्हा परिषद व नगर पंचायत निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागण्याचे निर्देश दिले.

 

Web Title: Gopaldas Agarwal paid a courtesy call on Amit Shah