शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रेती माफियांकडून ६.७४ कोटींचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

जिल्हा पोलीस विभागामार्फत जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक मोडीस काढण्याच्या दृष्टीने गुन्हे नोंद करण्यासोबतच महसूली कारवाई करण्यात येत आहे. अवैध रेती वाहतूक प्रकरणातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व त्यांच्या वाहतुकीच्या वेळेचा अभ्यास करून पोलीस अधीक्षकांनी विशेष पथकामार्फत तसेच स्थानिक पोलीस ठाणे स्तरावर चालू वर्षात १०३ गुन्हे दाखल करविले आहेत. त्यांच्याकडून सहा कोटी ७४ लाख ५७ हजार ४०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हा पोलिसांची कारवाई : १०३ गुन्ह्यात १८५ जणांना केले अटक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रेती घाटांचा लिलाव न झाल्यामुळे गरज पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत आहे. अशात रेतीची चोरी करणाऱ्यांवर साडे सहा महिन्यांत १०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात १८५ आरोपींना रेती चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.या रेती माफियांकडून जिल्हा पोलिसांनी सहा कोटी ७४ लाख ५७ हजार ४०० रूपयांचा माल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी दिली आहे.जिल्हा पोलीस विभागामार्फत जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक मोडीस काढण्याच्या दृष्टीने गुन्हे नोंद करण्यासोबतच महसूली कारवाई करण्यात येत आहे. अवैध रेती वाहतूक प्रकरणातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व त्यांच्या वाहतुकीच्या वेळेचा अभ्यास करून पोलीस अधीक्षकांनी विशेष पथकामार्फत तसेच स्थानिक पोलीस ठाणे स्तरावर चालू वर्षात १०३ गुन्हे दाखल करविले आहेत. त्यांच्याकडून सहा कोटी ७४ लाख ५७ हजार ४०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.रेती चोरून नेणारे ट्रॅक्टर चालक आपल्यावर कारवाई होऊ नये तसेच आपण पोलीस किंवा महसूल विभागाच्या हातात लागू नये यासाठी आपले वाहन भरधाव वेगाने हाकून रेती चोरी करतात. परंतु भरधाव वेगात वाहन चालविण्याच्या नादात मोठ्या प्रमाणात अपघात होतात. या अपघातांमध्ये अनेकांचा नाहक बळी जातो.हे प्रकार घडू नयेत व रेती चोरून नेणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करता यावी यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी रेती घाटाजवळ वाहतूक मार्गावर चर खोदून ठेवले आहे. यातून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जातोे.घाट लिलाव न झाल्यानेच होते चोरीजिल्ह्यातील रेती घाटांचा लिलावच न झाल्याने घरकुलांचे काम कसे करावे हा प्रश्न लोकांपुढे आहे. आपल्या घराचे काम पूर्ण करण्याकरिता रेतीसाठी अव्वाचे सव्वा पैसे मोजण्याची तयारी लोकांची दिसून येते. त्यामुळे अधिक नफा कमविण्यासाठी रेती माफीयांकडून अवैधरित्या रेतीचा उपसा केला जातो. परिणामी यात अनेक महसूल अधिकाऱ्यांचे हात ओले होतात. परिणामी कारवाई झालीच तर थातूर- मातूर केली जाते. जिल्हा प्रशासनाने यंदा रेतीच्या घाटाचे लिलाव न केल्यामुळे कोट्यवधीचा महसूल बुडाला आहे. घाट लिलाव झाले नाही त्यामुळे रेती चोरीचे प्रमाण वाढले. परिणामी चोरीच्या रेतीचे दरही गगणाला भिडले आहेत.रस्त्यांची वाताहतरेती चोरांकडून कच्च्या रस्त्यानेही जड वाहतूक केली जाते. परिणामी ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडतात. एक खड्डा वाचविण्याच्या नादात आपला तोल दुसऱ्या खड्यात जातो. परिणामी दुचाकी चालकांचेही त्या रस्त्याने जातांना अपघात होतात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेती अवैधरित्या वाहून नेली जात आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न आल्यामुळे आताही रेती चोरी सुरूच आहे.

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया