शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

गोंदिया होणार ‘शाळाबाह्य मूल विरहित’ जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 22:06 IST

बालकांच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी पालघर जिल्ह्याने शाळाबाह्य मूल विरहित जिल्हा ही संकल्पना पुढे आणली. परंतु या संकल्पनेला पूर्णत्वास नेऊन राज्यात पहिला ‘शाळाबाह्य मूल विरहित’ जिल्हा म्हणून गोंदिया पुढे येणार आहे.

ठळक मुद्दे१५ डिसेंबरला अधिकृत घोषणा : शाळाबाह्य मुलांचे अंतिम सर्वेक्षण

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालकांच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी पालघर जिल्ह्याने शाळाबाह्य मूल विरहित जिल्हा ही संकल्पना पुढे आणली. परंतु या संकल्पनेला पूर्णत्वास नेऊन राज्यात पहिला ‘शाळाबाह्य मूल विरहित’ जिल्हा म्हणून गोंदिया पुढे येणार आहे. प्रत्येक मूल शाळेत जाईल कुणीही घरी न राहील, या ब्रीद वाक्याचे सार्थक करण्याकडे गोंदिया शिक्षण विभागाचा कल आहे. गोंदिया जिल्ह्यातील ड्रॉप बॉक्समधील संख्या अत्यल्प आहे. ती संख्या दोन दिवसात निरंक होईल.शाळेपासून दूर असलेल्या शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करण्याचे काम राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाने केले. भीक मागून पोट भरणाऱ्या व बालमजूरी करणारे बाल कामगार शिक्षणापासून वंचीत राहू नये,अशा शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्याची मोहीम शिक्षण विभाग राबवित आहे. गोंदिया जिल्ह्यातील ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थ्यांची संख्या सुरूवातीला २ हजार ९८४ होती. त्यानंतर १ हजार ९०३ बालकांना शोधून त्यांची डाटा एन्ट्री करण्यात आली. त्यानंतर १०८१ बालके ड्रॉपबॉक्समध्ये होती. यापैकी १०६४ बालकांना शोध घेण्यात आतापर्यंत शिक्षण विभाग यशस्वी झाला आहे. आता केवळ १७ बालके ड्रॉपबॉक्समध्ये आहेत. त्यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९ व देवरी तालुक्यातील ८ बालकांचा समावेश आहे. ही देखील संख्या सुध्दा निरंक होणार आहे. त्या बालकांचा शोध घेणे सुरू आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार शाळाबाह्य मुलांना वयानुरुप समकक्ष वर्गात प्रवेश देत त्यांची संपादणूक पातळी वाढविण्यासाठी व अध्ययन फलनिष्पती साध्य करण्यासाठी वर्गशिक्षकांकडून त्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. शाळाबाह्य मुल राहू नये,यासाठी शासनाने बालरक्षकांनी संवेदनशीलतेने काम करून गोंदिया जिल्हा राज्यातील पहिला ‘शाळाबाह्य मूल विरहित’ जिल्हा म्हणून पुढे येण्याच्या मार्गावर आहे.१० बालकांचा मृत्यूड्रॉपबॉक्समध्ये असलेल्या बालकांचा शोध घेताना गोंदिया जिल्ह्यातील १०८१ बालकांपैकी १० बालकांचा मृत्यू झाल्याची बाब पुढे आली. १२७ विद्यार्थी आयटीआयमध्ये गेले, ८५ पॉलटेक्निकमध्ये, १८९ इतर राज्यात, १ मुक्त विद्यापीठात, ७१ नापास, १९२ शाळा सोडली, ६० विद्यार्थ्यांचा अनाधिकृत शाळांत प्रवेश, १८ विद्यार्थी पूर्वीच्याच शाळेत, ३२ विद्यार्थी दुसऱ्या तालुक्यात गेले, ११९ दुसऱ्या जिल्ह्यात, १९ नवीन प्रवेश, ७५ विनंतीवरून बदलले, २१ सीडब्ल्यूएसएन, ३७ वरील वर्गात तर इतर ८ विद्यार्थी असे एकूण १०६४ विद्यार्थी शोधण्यात आले. १७ विद्यार्थ्यांची ड्रॉपबॉक्समधील संख्या लवकरच कमी होणार आहे.चार दिवस चालणार अखेरचे सर्वेक्षणशाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न केले. ड्रॉप बॉक्समधील संख्या निरंक होत असताना जिल्ह्यात आणखी तर शाळाबाह्य मुले कुुठे नाहीत यासाठी शिक्षण विभागातर्फे २७ ते ३० नोव्हेंबर या चार दिवस शाळाबाह्य मुलांना शोधण्यासाठी अंतिम सर्वेक्षण करणार आहेत. या सर्वेक्षणात आढळलेल्या बालकांना लगेच शाळेत दाखल केले जाणार आहे.ड्राप बॉक्स मधील शाळाबाह्य मुलांची संख्या निरंक होण्याच्या मार्गावर आहे. गोंदिया जिल्हा शाळाबाह्य मूल विरहित जिल्हा म्हणून राज्यात पहिला असेल. बालकांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवून देत शाळाबाह्य मूल विरहित जिल्हा म्हणून १५ डिसेंबरला याची अधिकृत घोषणा करण्यात येईल.-उल्हास नरड,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.गोंदिया

टॅग्स :Schoolशाळा