शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया तालुक्यातच सर्वाधिक लाचखोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST

गोंदिया : काम करून देण्यासाठी सर्रास पैशांची मागणी करून लाचखोरी करणाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा हातोडा चांगलाच बसताना दिसत आहे. ...

गोंदिया : काम करून देण्यासाठी सर्रास पैशांची मागणी करून लाचखोरी करणाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा हातोडा चांगलाच बसताना दिसत आहे. हेच कारण आहे की, सन २०१८ पासून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातत्याने कारवाया करीत आला आहे. मात्र, धक्कादायक बाब अशी की, गोंदिया तालुक्यातच सर्वाधिक लाचखोर असल्याचे दिसत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालानुसार, सन २०१८ पासून आतापर्यंत गोंदिया तालुक्यातच सर्वाधिक ३७ कारवाया करण्यात आल्या असून यामध्ये ५१ लाचखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पूर्वी आपल्या हातून कुणाचे काही काम झाल्यास किंवा मदत झाल्यास पुण्य घडले, असे समजले जात होते. मात्र, कालांतराने ती विचारधारा लोप पावत गेली. आज सर्वच बाबीत अर्थकारण येऊ लागले आहे. यामुळेच आजघडीला कुणाचे काही काम करून देण्यासाठी चहापाणी किंवा मिठाईच्या नावावर सर्रास पैशांची मागणी केली जाते. पैसे घेऊन काम करून देण्यालाच लाचखोरी म्हटले जाते. त्यानुसार, कोणतेही काम करावयाचे असल्यास थेट पैसे देऊन काम करणे ही आजची परंपरा झाली आहे. यामुळे मात्र अशा या लाचखोरांचे तोंड दिवसेंदिवस जास्तच फाटत चालले आहे. अशा या लाचखोरांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची असून ते अशा या प्रकरणांत कारवाया करतात. असे असले तरीही एखादा तोंडी लागलेला पैशांचा चस्का कमी होत नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सातत्याने कारवाया सुरूच आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक लाचखोर असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालातून दिसून येते. हेच कारण आहे की, सन २०१८ पासून आतापर्यंतची आकडेवारी बघितल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तालुक्यात लाचखोरीच्या ३७ कारवाया केल्या असून यामध्ये ५१ लाचखोरांना दणका देत गुन्हा नोंद केला आहे.

——————————————————-

आतापर्यंत ६९ कारवायांत ८८ लाचखोरांवर गुन्हा

सन २०१८ पासून जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कारभार सुरू झाला आहे. तेव्हापासून आतापर्यंत विभागाने जिल्ह्यात ६९ कारवायांत ८८ लाचखोरांवर गुन्हा नोंद केला आहे. यात सर्वाधिक गोंदिया तालुक्यात ३७ कारवायांत ५१ लाचखोर असून सर्वात कमी देवरी तालुक्यात १ कारवाई असून १ लाचखोरावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, देवरीत सन २०१८, १९ व २० मध्ये एकही कारवाई नसून सन २०२१ मधील ही पहिलीच कारवाई आहे.

—————————————————

५ महिन्यात केल्या ६ कारवाया

सन २०२१ मध्ये आता मे महिना संपत आला आहे. म्हणजेच, ५ महिने झाले असून या ५ महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत ६ कारवाया केल्या असून ८ लाचखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षापासून कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. कोरोनाने पैसा कामी येत नसून आपले संचितच कामी येत असल्याचे दाखवून दिले आहे. तरीही, लाचखोरांना फक्त पैसाच हवा असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालातून दिसून येते.

——————————————

कारवायांचा तालुकानिहाय तक्ता (सन २०१८ ते आतापर्यंत)

तालुका गुन्हे आरोपी

गोंदिया ३७ ५१

गोरेगाव ६ ८

तिरोडा १० १२

आमगाव ४ ४

देवरी १ १

सडक-अर्जुनी ४ ४

अर्जुनी-मोरगाव ३ ४

सालेकसा ४ ४

एकूण ६९ ८८