Gondia: मजूर महिलांना सोडून परतणारा ट्रॅक्टर नदीत वाहून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 22:00 IST2024-07-22T22:00:02+5:302024-07-22T22:00:20+5:30

Gondia News: रोवणीसाठी आलेल्या मजूर महिलांना त्यांच्या गावात सोडून परत येत असताना ट्रॅक्टर नदीच्या पुलावरून प्रवाहात वाहून गेला. ही घटना सोमवारी (दि.२२) सायंकाळी ६ वाजता देवरी तालुक्यातील ग्राम शिलापूर येथील वाघनदीच्या पुलावर घडली.

Gondia: Returning tractor carrying women laborers washed away in river | Gondia: मजूर महिलांना सोडून परतणारा ट्रॅक्टर नदीत वाहून गेला

Gondia: मजूर महिलांना सोडून परतणारा ट्रॅक्टर नदीत वाहून गेला

गोंदिया - रोवणीसाठी आलेल्या मजूर महिलांना त्यांच्या गावात सोडून परत येत असताना ट्रॅक्टर नदीच्या पुलावरून प्रवाहात वाहून गेला. ही घटना सोमवारी (दि.२२) सायंकाळी ६ वाजता देवरी तालुक्यातील ग्राम शिलापूर येथील वाघनदीच्या पुलावर घडली.

देवरी तालुक्यातील ग्राम पदमपूर येथील रहिवासी उईके यांच्या ट्रॅक्टरने रोवणीच्या मजुरांना मुरपार येथून ने-आण केली जाते. सोमवारी (दि. २२) रोवणीसाठी पदमपूर येथे गेलेल्या महिला मजुरांना ट्रॅक्टरने सायंकाळी मुरपार येथे सोडून देण्यासाठी शिलापूर येथील वाघनदीच्या पुलावरूनच नेण्यात आले. त्यावेळी पुलावर पाणी कमी होते. परंतु मजूर महिलांना सोडून आल्यावर पाण्याचा प्रवाह वाढला होता. पुलावरून पाणी वाहत असतानाही चालकाने पाण्यात ट्रॅक्टर टाकला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ट्रॅक्टर वाहून गेला. संधी साधून चालकाने नदीत उडी घेतली व पाेहत तो काठावर आल्याने बचावला.

Web Title: Gondia: Returning tractor carrying women laborers washed away in river