Gondia: वसंतराव नगरातील जुगार अड्ड्यावर धाड एक लाख २० हजाराचा माल जप्त
By नरेश रहिले | Updated: October 1, 2023 13:47 IST2023-10-01T13:46:37+5:302023-10-01T13:47:36+5:30
Crime News: रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बसंत टाल जवळ जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर धाड घालून रामनगर पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्या सातही जणांजवळून ७ मोबाईल, ३५ हजार ६०० रुपये रोख असा माल जप्त करण्यात आला आहे.

Gondia: वसंतराव नगरातील जुगार अड्ड्यावर धाड एक लाख २० हजाराचा माल जप्त
- नरेश रहिले
गोंदिया - रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बसंत टाल जवळ जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर धाड घालून रामनगर पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्या सातही जणांजवळून ७ मोबाईल, ३५ हजार ६०० रुपये रोख असा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांनी केली आहे.
आरोपी विक्की रवींद्र आगाशे (३६) रा. बसंत टाल जवळ रामनगर, योगेश्वर मुनेश्वर जोशी (३२) रा. मरारटोली बसस्टॉप जवळ गोंदिया, अमित गुलाब मेश्राम (३४) रा. गांधी राईस मिल जवळ मरारटोली, जितेंद्र चंद्रभान बिंझाडे (३०) रा. आंबेडकर चौक कुडवा, राकेश गोपी रजक (४०) रा. रेलटोली शाहू मोहल्ला गोंदिया, ताहीर जलील शेख (३५) रा. रामनगर बाजार चौक गोंदिया, रिजवान इकबाल शेख (३३) रा. रामनगर गोंदिया व इतर दोन असे नऊ लोक जुगार खेळत असताना रामनगर पोलिसांनी धाड घालून ८४ हजार रुपये किंमतीचे ७ मोबाईल व ३५ हजार ६०० रुपये रोख असा एकूण १ लाख १९ हजार ६५० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. आरोपींवर रामनगर पोलिसांनी महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार फुलबांधे करीत आहेत.