गोंदियात शेतकऱ्याची आत्महत्या; झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळला मृतदेह

By अंकुश गुंडावार | Updated: September 5, 2022 15:32 IST2022-09-05T15:21:44+5:302022-09-05T15:32:38+5:30

नवेगावबांध येथील घटना

Gondia farmer's suicide; The body was found hanging from a tree | गोंदियात शेतकऱ्याची आत्महत्या; झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळला मृतदेह

गोंदियात शेतकऱ्याची आत्महत्या; झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळला मृतदेह

नवेगाव बांध ( गोंदिया : नवेगाव बांध येथील शेतकरी, सोविंदा सुखराम राऊत ( ६१ ) वर्ष, राहणार,नवेगावबांध येथील रहिवासी असून या शेतकऱ्याने सकाळी स्वतःच्या शेतात जाऊन प्लास्टीक केन रस्सीच्या सहाय्याने बोरीच्याझाडावर स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली.

सोविंदा सुखराम राऊत हा, पत्नी, सून, मुलगा, असे सर्व मिळून एकत्र राहत होता व मोलमजुरी व शेतीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. ५ सप्टेंबरच्या पहाटे सोविंदा सुखराम राऊत हा पत्नीला आपल्या स्वतःच्या शेताकडे जातो म्हणून सांगून गेला. त्यानंतर तो परतलाच नाही, घरच्यांनी शेतात जाऊन बघितले असता घटना उघडकीस आली. घटनेचा तपास नवेगाव बांध पोलीस स्टेशन चे स.पो.नी.संजय पांढरे यांच्या मार्गदर्शनात पोहवा, साईनाथ नाकाडे,बापू येरणे, इंद्रपाल कोडापे तपास करीत आहेत.

Web Title: Gondia farmer's suicide; The body was found hanging from a tree