गोंदिया येथील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 10:40 IST2019-05-17T10:40:16+5:302019-05-17T10:40:44+5:30
येथील जिल्हा कांग्रेस कमिटीचे कार्यालय असलेल्या भोलाभवन इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

गोंदिया येथील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाला आग
ठळक मुद्देजिवीतहानी नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: येथील जिल्हा कांग्रेस कमिटीचे कार्यालय असलेल्या भोलाभवन इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे. मात्र या आगीमुळे थोडया फार प्रमाणात नुकसान झाले. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.