शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

२१ दिवसात गोंदिया जिल्हा झाला कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST

२६ मार्चला गोंदिया जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा रुग्ण बरा होवून एप्रिल महिन्यात घरी परतला. तब्बल ३८ दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनमुळे विविध राज्यात आणि जिल्ह्यात अडकून असलेल्या मजूर आणि नागरिकांना त्यांच्या स्वगृही जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे मुंबई, पुणे आणि इतर रेड झोनमधील नागरिक स्वगृही परतले.

ठळक मुद्दे६८ रुग्ण झाले पूर्णपणे बरे : जिल्हावासीयांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेला कोरोना बाधित बुधवारी (दि.१०) कोरोनामुक्त झाला. त्यामुळे आता गोंदिया जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला असून २१ दिवसांच्या कालावधीत ६८ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आता एकही कोरोना बाधित रुग्ण नसून आता जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त कसा ठेवता येईल हे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.२६ मार्चला गोंदिया जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा रुग्ण बरा होवून एप्रिल महिन्यात घरी परतला. तब्बल ३८ दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनमुळे विविध राज्यात आणि जिल्ह्यात अडकून असलेल्या मजूर आणि नागरिकांना त्यांच्या स्वगृही जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे मुंबई, पुणे आणि इतर रेड झोनमधील नागरिक स्वगृही परतले. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला. मुंबई, पुण्याहून आलेल्या नागरिकांमुळे १९ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ६८ वर पोहचली.विशेष म्हणजे हे सर्व कोरोना बाधित ग्रामीण भागातील असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले असल्याने २१ दिवसांच्या कालावधीत सर्वच कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले. मंगळवारी गोंदिया येथील कोविड केअर सेंटरमधील दोन कोरोना बाधितापैकी एक जण कोरोनामुक्त झाला.त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये केवळ एकाच कोरोना बाधितावर उपचार सुरू होता. बुधवारी तो सुध्दा कोरोनामुक्त झाल्याने त्याला कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात आता एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याने जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. निश्चितच ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.प्रशासनासमोर कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हानतब्बल २१ दिवसांच्या कालावधीनंतर गोंदिया जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे जिल्हा यापुढेही कसा कोरोनामुक्त राहिल यासाठी जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाला उपाययोजना करण्याची गरज आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर बारीक नजर ठेवून त्यांची सीमा तपासणी नाक्यावर आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे.कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असणार आहे.कोविड केअर सेंटरमध्ये आनंदाचे वातावरणयेथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये मागील २१ दिवसात एकूण ६८ कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यात आले होते. मात्र यानंतर हळूहळू रुग्ण बरे होवून परत गेल्याने केवळ एका कोरोना बाधितावर उपचार सुरू होता. पण बुधवारी (दि.१०) तो कोरोना बाधित सुध्दा कोरोनामुक्त झाल्याने कोविड केअर सेंटरमध्ये आता एकही कोरोना बाधित नाही. बुधवारी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला सुटी देताना येथील डॉक्टर आणि परिचारिकांनी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. एकंदरीत कोविड केअर सेंटरमध्ये आनंदाचे वातावरण होते.१०६० स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण ११२९ जणांचे स्वॅब नमुने घेवून नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ६८ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह तर १०६० स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या