Gondia: पिपरीया येथून दारूसह २१ हजारांचे साहित्य जप्त

By नरेश रहिले | Updated: August 19, 2023 20:20 IST2023-08-19T20:20:01+5:302023-08-19T20:20:52+5:30

Gondia: सालेकसा तालुक्यातील पिपरीया येथे मोहफुलापासून दारू गाळणाऱ्या आरोपींकडून २१ हजार ८१० रुपयांचा माल जप्त करून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Gondia: 21 thousand worth of materials including liquor seized from Piparia | Gondia: पिपरीया येथून दारूसह २१ हजारांचे साहित्य जप्त

Gondia: पिपरीया येथून दारूसह २१ हजारांचे साहित्य जप्त

- नरेश रहिले  
गोंदिया : सालेकसा तालुक्यातील पिपरीया येथे मोहफुलापासून दारू गाळणाऱ्या आरोपींकडून २१ हजार ८१० रुपयांचा माल जप्त करून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई १८ ऑगस्ट रोजी करण्यात आली. पिपरीया येथील आरोपी दादू मनिराम मडावी (५१) याच्या घरी पोलिसांनी धाड घालून माजघरात दोन नग प्लास्टिक पॉलिथीनमध्ये २०० किलो सडवा मोहफुल, जळावू लाकडे ३० किलो, एक जर्मन करची, एक बांबुचा टवेरा, एक रबरी ट्यूबमध्ये ७० लिटर हातभट्टीची दारू किंमत ७ हजार असा एकूण २१ हजार ८१० रुपयांचा माल जप्त केला.

आरोपी दादू मनीराम मडावी (५१) रा. पिपरीया ता. सालेकसा याच्याविरुद्ध सालेकसा पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ६५ (ई), ६६(१),(ब), (क), (ड)(फ) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलिस हवालदार चंद्रिकापुरे करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, आमगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलिस उपनिरीक्षक अमोल मुंडे, पोलिस शिपाई इंगळे, विकास वेदक, महिला पोलिस शिपाई आंबाडारे यांनी केली आहे.

Web Title: Gondia: 21 thousand worth of materials including liquor seized from Piparia