थेट गावात जाऊन समस्यांचे निराकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:56 AM2018-08-06T00:56:55+5:302018-08-06T00:57:46+5:30

एखाद्या राजकीय पुढाऱ्याची गावखेड्यातील सामान्य जनतेशी सामाजिक नाळ जुडली असेल तर गावात उद्भवणाºया प्राथमिक समस्यांवर वेळीच मात करता येवू शकते. परंतु आजकाल एकदा मतदारांनी निवडून दिले तर त्या लोकप्रतिनिधींचे दर्शनच होत नाही, अशी अवस्था तालुक्यात दिसत आहे.

Going straight to the village, solve the problems | थेट गावात जाऊन समस्यांचे निराकरण

थेट गावात जाऊन समस्यांचे निराकरण

Next
ठळक मुद्देअरविंद शिवणकर : मूलभूत सोयी-सुविधांसाठी प्रयत्नशील

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : एखाद्या राजकीय पुढाऱ्याची गावखेड्यातील सामान्य जनतेशी सामाजिक नाळ जुडली असेल तर गावात उद्भवणाºया प्राथमिक समस्यांवर वेळीच मात करता येवू शकते. परंतु आजकाल एकदा मतदारांनी निवडून दिले तर त्या लोकप्रतिनिधींचे दर्शनच होत नाही, अशी अवस्था तालुक्यात दिसत आहे. असे असले तरी ग्रामीण जनतेच्या समस्यांची जाण ठेवून सातत्याने तालुक्यातील जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या व्यथा व समस्या ऐकून तात्काळ निराकरण करण्याचे धाडस पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी केले. पहिल्या प्रथमच लोककल्याणार्थ उपक्रम त्यांनी भिवखिडकी येथे राबविला. त्याला गावकºयांचा प्रतिसाद सुद्धा चांगला मिळाला.
आजघडीला तालुक्यातील गाव पातळीवरील जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरील समस्यांनी सामान्य जनता त्रस्त होवून गेली आहे. यामध्ये सार्वजनिक कामे तसेच गावातील वैयक्तीक कामांचा समावेश आहे. बºयाचदा लाभार्थ्यांना लांबदुरुन पंचायत समिती कार्यालयाची अनेकदा पायपीट करावी लागते. ज्या ठिकाणी नव्या बांधकामाचा प्रसंग असला तेव्हा मात्र लोकप्रतिनिधी स्वत:ला झोकून त्याची पूर्तता करण्याला प्रथम प्राधान्य देत असल्याचे पंचायत समिती वर्तुळात बोलल्या जाते. तालुक्यातील पंचायत समिती गण, जिल्हा परिषद प्रभागातील जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी लोकप्रतिनिधींना वेळच मिळत नाही. यामध्ये जागरुक लोकप्रतिनिधींना वेळच मिळत नाही. तालुक्यात आजघडीपर्यंत प्रभागनिहाय आढावा बैठका झाल्याचे ऐकिवात नाही. यामध्ये जागरुक लोकप्रतिनिधींचा अपवाद आहे.
गावखेड्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नांशी समरस होवून गेल्या कित्येक वर्षापासून एक जागरुक लोकप्रतिनिधी म्हणून तालुक्यात परिचित असलेले पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी भिवखिडकी गावात जावून गावकºयांच्या गाºहाणी व समस्या ऐकण्याचा कसोशीने प्रयत्न केला. तेथील अंगणवाडी केंद्र, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत कार्यालयात जावून प्रत्यक्ष पाहणी केली. विविध समस्या स्वत: जवळून पाहिल्या. संबंधित विभागाचा आढावा घेतला. पंचायत समिती स्तरावरील समस्यांचे त्याचक्षणी निराकरण करण्यात आले.
गावामध्ये साथीच्या रोगाची लागण होऊ नये, अंगणवाडीतील ० ते ५ वयोगटातील मुलांना चांगला आहार मिळावा, गरोदर मातांची नियमित तपासणी करुन औषधोपचार करण्यात यावा, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता तसेच बौद्धीक क्षमता वाढविण्यासाठी संबंधितांनी प्रयत्नशील राहावे, असे याप्रसंगी अरविंद शिवणकर यांनी आवर्जुन सांगितले.
गावात येवून गावाच्या समस्या ऐकून वेळीच त्यांचे निराकरण केल्यामुळे उपसरपंच अरविंद नागपुरे यांनी सभापती शिवणकर यांचे आभार मानले. याप्रसंगी सरपंच कविता गेडाम, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलसुंगे, मुख्याध्यापक, शिक्षक, आरोग्य सेविका उपस्थित होते.
 

Web Title: Going straight to the village, solve the problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.