कंटेन्मेंट झोनमध्ये शिथिलता द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:00:41+5:30
स्थानिक प्रशासनाने सिव्हील लाईन येथील नागरिकांना कुठलीही पूर्व सूचना व दवंडी न देता १७ जुलैला हा संपूर्ण परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत करुन सील केला. पूर्व सूचना न मिळाल्याने नागरिकांना जिवनावश्यक वस्तुंचा साठा करुन ठेवता आला नाही. परिणामी आता त्यांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या परिसरात मागील ७ दिवसांपासून भाजीपाला, दूध, किराणा आदींचा सुध्दा पुरवठा करण्यात आला नाही.

कंटेन्मेंट झोनमध्ये शिथिलता द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील सिव्हील लाईन परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने स्थानिक प्रशासनाने हा परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत करुन संपूर्ण परिसर सील केला आहे. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमध्ये शिथिलता देण्यात यावी अशी मागणी सिव्हील येथील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
स्थानिक प्रशासनाने सिव्हील लाईन येथील नागरिकांना कुठलीही पूर्व सूचना व दवंडी न देता १७ जुलैला हा संपूर्ण परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत करुन सील केला. पूर्व सूचना न मिळाल्याने नागरिकांना जिवनावश्यक वस्तुंचा साठा करुन ठेवता आला नाही. परिणामी आता त्यांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या परिसरात मागील ७ दिवसांपासून भाजीपाला, दूध, किराणा आदींचा सुध्दा पुरवठा करण्यात आला नाही. या परिसरात विविध क्षेत्रात काम करणारे खासगी कर्मचारी, व्यापारी, कॅटरिंग व्यावसायिक, शेतकरी, आटा चक्की चालक आहेत. त्यांना सुध्दा त्यांच्या कामावर ये-जा करण्यासाठी अडचणीचे जात आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी पास वितरीत करण्यात यावे.
मागील ४ महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्यांना त्याचा फटका बसत असून त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. प्रशासनाने १४ दिवसांचा कंटेन्मेंट झोनचा कालावधी कमी करावा अशी मागणी या वेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
शिष्टमंडळात नगरसेविका भावना कदम, प्रल्हाद वरदानी, अमोल मुंगमोडे, विक्की मोहरे, बंटी रोकडे, दीपक कदम, शिवकुमार दुबे, सुरेश ढाले, मुकेश जैन यांच्यासह नागरिकांचा समावेश होता.