लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या आमगाव-देवरी क्षेत्रातील शेतकऱ्यांना शासनाने मोफत बी-बियाणे व रासायनिक खते उपलब्ध करुन द्यावी. या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (दि.८) उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार ओंकार ठाकरे यांना देण्यात आले.या वेळी दिलेल्या निवेदनातून आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी हा सततच्या दुष्काळ परिस्थितीमुळे हवालदिल झाला आहे. पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित आहेत. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या या क्षेत्रातील शेतकऱ्यांना शासनातर्फे मोफत बी-बियाणे व रासायनिक खताची पूर्तता करण्याची मागणी या निवेदनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शिष्टमंडळात सहषराम कोरोटे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भाटीया, माजी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगडीया, माजी सभापती वसंत पुराम, देवरी नगरपंचायतचे माजी उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, माजी उपसभापती संगीता भेलावे, जिल्हा काँग्रेसचे प्रतिनिधी बळीराम कोटवार, माजी पं.स.सदस्य सोनू नेताम, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष नरेश राऊत, युवक काँग्रेसचे कुलदीप गुप्ता, घनश्याम फरकुंडे, बबलू कुरैशी, अरविंद उके, राजेश गहाणे, काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ता मानिकबापू आचले, गणेश भेलावे, जैपाल प्रधान, छगनलाल मुंगनकर, राकेश बहेकार, सुभाष सराटे, अभय जमदाळ, अविनाश सोनटक्के, सचिन अम्बरवाडे, मदन रहिले, डॉ. भूमेश पटले, ब्रम्हानंद फरकुंड आदीचा समावेश होता.
शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 22:30 IST
सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या आमगाव-देवरी क्षेत्रातील शेतकऱ्यांना शासनाने मोफत बी-बियाणे व रासायनिक खते उपलब्ध करुन द्यावी. या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात...
शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते द्या
ठळक मुद्देकाँग्रेसचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : आंदोलनाचा इशारा