शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विषयक साहित्य खरेदीसाठी दोन लाखाचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सडक अर्जुनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिनस्त १४० ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका १९०, आशा कार्यकर्ता ९०, आरोग्य सेवक आणि सेविका मिळून ९०, वैद्यकीय अधिकारी व इतर ३० असा एकूण ५५० कर्मचाऱ्यांची सेवा वर्ग करण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्थानिक विकास निधी : तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला दिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात युद्ध पातळीवर संघर्ष सुरू आहे. या महायुद्धात वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र लढा देत आहेत. स्वत:ची व कुटुंबाची पर्वा न करता सेवा देत आहेत. मात्र सेवा देत असताना त्यांचेकडे प्रतिबंधात्मक साहित्य पुरेशे उपलब्ध नाहीत. आरोग्य विभागाकडे सुद्धा पुरेसा निधी व मनुष्यबळ नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणी येत आहेत. सडक अर्जुनी तालुक्यात अशी परिस्थिती निर्माण होवू नये म्हणून जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून सडक अर्जुनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना साहित्य खरेदीसाठी दोन लाख रूपयांची मदत केली आहे.कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सडक अर्जुनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिनस्त १४० ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका १९०, आशा कार्यकर्ता ९०, आरोग्य सेवक आणि सेविका मिळून ९०, वैद्यकीय अधिकारी व इतर ३० असा एकूण ५५० कर्मचाऱ्यांची सेवा वर्ग करण्यात आली आहे.वरील सर्वांना स्वत:च्या बचावाकरिता मास्क, हॅन्डवाश, सॅनिटायझर व पी.पी.किट असणे गरजेचे आहे.तालुक्यातील खोडशिवनी, डव्वा, शेंडा व पांढरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सडक अर्जुनी व सौंदड हे ग्रामीण रूग्णालय आहेत. मात्र कोरोना महामारीवर मात करण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेसा निधी व मनुष्यबळ नाही.हा चिंतेचा विषय आहे. तरीही स्वत:चा विचार न करता तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये, यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. याच सर्व बाबींचा विचार करून जि.प.सदस्य परशुरामकर यांनी कार्यकारी अभियंता सा.बा. विभाग गोंदिया यांना पत्र लिहून त्यांच्या स्थानिक विकास निधीतून तालुका वैद्यकीय अधिकारी सडक अर्जुनी यांना साहित्य खरेदीसाठी दोन लक्ष रूपये त्वरीत देण्याचे निर्देश दिले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर