कोरोना विषयक साहित्य खरेदीसाठी दोन लाखाचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:11+5:30
कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सडक अर्जुनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिनस्त १४० ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका १९०, आशा कार्यकर्ता ९०, आरोग्य सेवक आणि सेविका मिळून ९०, वैद्यकीय अधिकारी व इतर ३० असा एकूण ५५० कर्मचाऱ्यांची सेवा वर्ग करण्यात आली आहे.

कोरोना विषयक साहित्य खरेदीसाठी दोन लाखाचा निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा (कोयलारी) : कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात युद्ध पातळीवर संघर्ष सुरू आहे. या महायुद्धात वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र लढा देत आहेत. स्वत:ची व कुटुंबाची पर्वा न करता सेवा देत आहेत. मात्र सेवा देत असताना त्यांचेकडे प्रतिबंधात्मक साहित्य पुरेशे उपलब्ध नाहीत. आरोग्य विभागाकडे सुद्धा पुरेसा निधी व मनुष्यबळ नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणी येत आहेत. सडक अर्जुनी तालुक्यात अशी परिस्थिती निर्माण होवू नये म्हणून जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून सडक अर्जुनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना साहित्य खरेदीसाठी दोन लाख रूपयांची मदत केली आहे.
कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सडक अर्जुनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिनस्त १४० ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका १९०, आशा कार्यकर्ता ९०, आरोग्य सेवक आणि सेविका मिळून ९०, वैद्यकीय अधिकारी व इतर ३० असा एकूण ५५० कर्मचाऱ्यांची सेवा वर्ग करण्यात आली आहे.
वरील सर्वांना स्वत:च्या बचावाकरिता मास्क, हॅन्डवाश, सॅनिटायझर व पी.पी.किट असणे गरजेचे आहे.
तालुक्यातील खोडशिवनी, डव्वा, शेंडा व पांढरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सडक अर्जुनी व सौंदड हे ग्रामीण रूग्णालय आहेत. मात्र कोरोना महामारीवर मात करण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेसा निधी व मनुष्यबळ नाही.
हा चिंतेचा विषय आहे. तरीही स्वत:चा विचार न करता तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये, यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. याच सर्व बाबींचा विचार करून जि.प.सदस्य परशुरामकर यांनी कार्यकारी अभियंता सा.बा. विभाग गोंदिया यांना पत्र लिहून त्यांच्या स्थानिक विकास निधीतून तालुका वैद्यकीय अधिकारी सडक अर्जुनी यांना साहित्य खरेदीसाठी दोन लक्ष रूपये त्वरीत देण्याचे निर्देश दिले आहे.