फुट पंपाद्वारे शेतीस पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 21:54 IST2017-11-11T21:54:42+5:302017-11-11T21:54:53+5:30

शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था कमी भांडवलामध्ये व्हावी, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने नुकतेच मुंडीपार येथे आय. आय. टी. मुंबईचे संशोधन असलेल्या फुट पाणी पंपाचे व ड्रिपचे प्रात्यक्षिक....

Ft. Paddywood Farm | फुट पंपाद्वारे शेतीस पाणी

फुट पंपाद्वारे शेतीस पाणी

ठळक मुद्देमहिला आर्थिक विकास महामंडळाचा उपक्र म : पाणी व विजेची बचत शक्य

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था कमी भांडवलामध्ये व्हावी, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने नुकतेच मुंडीपार येथे आय. आय. टी. मुंबईचे संशोधन असलेल्या फुट पाणी पंपाचे व ड्रिपचे प्रात्यक्षिक शेतकºयांना देण्यात आले. यामुळे वीज आणि पैशाची बचत करणे शेतकºयांना शक्य होणार आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे सालेकसा तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजिविका अभियान राबविले जात आहे. ग्रामीण महिलांच्या उपजिविका वाढविण्याकरीता सुधारित शेळी पालनावर आधारित उपजिविका कार्यक्र म, मत्स्यपालनावर आधारित कार्यक्र म व कृषी फलोत्पादन कार्यक्र म राबविण्यात येत आहे.
कृषी फलोत्पादन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील शेतकरी महिलांच्या उत्पादन वाढीच्या कार्यक्रमातंर्गत शेतमजुरीवर होणारा अधिकचा खर्च कमी करुन उत्पन्नात भर पडावी, कमी वेळेत अधिक काम पार व्हावे, या हेतूने यांत्रिकी शेतीवर भर देण्यासाठी गाव पातळीवर कृषी अवजारे बँकेची संकल्पना राबविण्यात आली. सालेकसा तालुक्यातील खोलगड, कारु टोला व मुंडीपार या गावी सदर औजार बँकेकरीता प्रती गाव ३ लाख रु पयांचा निधी देण्यात आला. याच उपक्रमातंर्गत शेतकºयांना वीज आणि पाण्याची बचत करणे शक्य व्हावे. यासाठी फुट पाणी पंपाचे व ड्रिपचे प्रात्यिक्षक करण्यात आले. या फुट पाणी पंपाद्वारे विहीर, कालव्यातून किंवा नाल्यातून २५ फुटापर्यंतचे पाणी विना विद्युत ओढून वरती ४० फुटापर्यंत आणण्याकरिता २ इंचाच्या पाईपच्या सहाय्याने १०० फुटापर्यंत पुढे व १ इंचाच्या पाईपच्या सहाय्याने ३०० फुटापर्यंत पुढे या पंपाद्वारे शेतीला पाणी देणे शक्य आहे. विना विद्युत ठिबक सिंचन करता येते. याकरीता शेतकºयांकडे पाण्याची किमान २०० लिटरची टाकी आवश्यक असून याद्वारे जमीन सिंचनाखाली आणणे शक्य आहे.
याकरीता फुट पाणी पंप ४९५० रु पयांना व ठिबक सिंचन (ड्रीप) एका गुंठ्याकरीता १८०० रुपयांच्या खर्चात मिळू शकेल. अल्पभूधारक शेतकºयांनाही हया फुट पाणी पंप व ठिबक सिंचनाद्वारे कमी भांडवलात जास्त उत्पादन घेवू शकतील. अशी माहिती आय.आय.टी.मुंबईचे प्रकल्प अभियंता विकास झा यांनी दिली. या प्रात्यक्षिकास शेतकºयांनी चांगला प्रतिसाद दिला.
प्रात्यक्षिकाकरीता माविमचे जिल्हा समन्यवक अधिकारी सुनील सोसे, उमेदचे जिल्हा उपजिविका व्यवस्थापक नसीर शेख, माविम सालेकसा तालुका कार्यक्रम व्यवस्थापक अनिल गायकवाड, तालुक्यातील कृषी सखी, गावातील शेतकरी, स्वयंसहायता महिला बचतगटातील महिला, प्रभाग समन्वयक, सहयोगीनी समुदाय पशुधन व्यवस्थापक व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Ft. Paddywood Farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.