अंगणवाडी कर्मचाºयांचा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 23:31 IST2017-09-17T23:31:01+5:302017-09-17T23:31:18+5:30

महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कृती समिती व महाराष्टÑ राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने (आयटक) प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढून विस्तार अधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

Front for the project office of Anganwadi workers | अंगणवाडी कर्मचाºयांचा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा

अंगणवाडी कर्मचाºयांचा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कृती समिती व महाराष्टÑ राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने (आयटक) प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढून विस्तार अधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
मोर्च्याचे नेतृत्व गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष हौसलाल रहांगडाले यांनी केले. ११ सप्टेंबर २०१७ पासून अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा बेमुदत संप राज्यात सुरु आहे. २ लाख १० हजार सेविका मदतनीस संपात सहभागी आहेत. गोंदिया जिल्ह्यात ३ हजार १८६ कर्मचारी आहेत. १४ सप्टेंबर २०१७ ला एकात्मिक बालविकास सेवा कार्यालय देवरीवर मोर्चा काढण्यात आला.
१६ सप्टेंबरला सडक-अर्जुनी प्रकल्प कार्यालयावर धरणे देवून निवेदन पंकजा मुंडे यांच्या नावे देण्यात आले. मोर्च्यात जिल्हा उपाध्यक्ष शेखर कनोजिया, विजया डोंगरे, कांचन शहारे,वच्छला भोगाडे, अनिता घोटे, पंचवती सोनबोईर, शोभा लांजेवार, धनिका जांभूळकर, संगीता शहारे, पुष्पा ठाकुर, परेश दुरुगवार, आम्रकला डोंगरे, पोर्णिमा चुटे, विनीता शहारे, माया गजभिये, चंद्रकला डोंगरवार, प्रिया नगणवनी, प्रमिला शहारे, निर्मला परशुरामकर, अनिला वालदे, मिना परतेती, किसना रणदिवे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
विस्तार अधिकारी यांना महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावे निवेदन देण्यात आले. या संपाची प्रमुख मागणी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी यांच्या अल्प मिळत असलेल्या मानधनात वाढ करण्यात यावे, मानधन वाढ आहार दरात वाढ करा, आजारपणाची १५ दिवसाची रजा या मागण्यासाठी हा संप सुरु आहे.

Web Title: Front for the project office of Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.