शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनी मोरगाव तालुका समस्यामुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:00 IST

या वेळी दिलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी ज्या गावांना मिळत नाही, अशा गावापर्यंत पाणी पोहचवावे, झाशीनगर उपसा सिंचन योजनेला गती देण्यात यावी. कुशल कामाचे थकीत देयके त्वरित देण्यात यावे, मनरेगाचे अकुशल काम त्वरीत सुरु करावे. ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन सोयी सुविधा द्या. मनरेगाचे २५ लाखापर्यंतचे अंदाजपत्रकांना पंचायत समिती स्तरावर तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी.

ठळक मुद्देसरपंच संघटनेची मागणी : लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे

लोकमत न्यूज नेटवर्कबोंङगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुका जिल्ह्याच्या टोकावर असून नक्षलप्रभावित आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी एकही उद्योग नाही. तालुक्यातील काही गावांमध्ये बारमाही जलसिंचनाच्या सोयींचा अभाव आहे. उपजिल्हा रुग्णालयाचा अभाव आहे. यासर्व समस्या मार्गी लावण्याची मागणी अर्जुनी मोरगाव तालुका सरपंच संघटनेतर्फे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व आ.मनोहर चंद्रिकापूरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.या वेळी दिलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी ज्या गावांना मिळत नाही, अशा गावापर्यंत पाणी पोहचवावे, झाशीनगर उपसा सिंचन योजनेला गती देण्यात यावी. कुशल कामाचे थकीत देयके त्वरित देण्यात यावे, मनरेगाचे अकुशल काम त्वरीत सुरु करावे. ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन सोयी सुविधा द्या. मनरेगाचे २५ लाखापर्यंतचे अंदाजपत्रकांना पंचायत समिती स्तरावर तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी. जिल्हा परिषद शाळांच्या जीर्ण व धोकादायक इमारतींना पाडण्याची मंजुरी द्यावी, ग्रामपंचायतच्या जीर्ण ईमारती पाडून नवीन बांधकामास परवानगी द्यावी. ग्रामसभेने ठरवलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्यक्रम देऊन घरकुलाचा कार्यारंभ आदेश द्यावा. १४ व्या वित्त आयोगातून संगणक परिचालकाचे वेतन न देता जिल्हा परिषदेच्या निधीमधून देण्यात यावे. १४ व्या वित्त आयोगाच्या सन २०१६-१७, १७-१८ व १८-१९ या वर्षाचा फरफार्मन्स निधी त्वरित ग्रामपंचायतच्या खात्यात जमा करावा.सरपंच व उपसरपंच यांचे मानधन लोकसंख्येवर आधारीत न ठेवता सरसकट पाच व तीन हजार रुपये करावे आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष हेमकृष्ण संग्रामे, सरचिटणीस अशोक कापगते, डॉ. अजय अंबादे, यादवराव मसराम, लालसिंह चंदेल, पदमा राठोड, डॉ. दिपक रहिले, प्रकाश शिवणकर, ज्ञानेश्वर चौधरी, कुंडा डोंगरवार यांचा समावेश होता.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले