वाहन पुलाखाली पडून चार मजुरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 12:17 IST2019-07-28T12:17:41+5:302019-07-28T12:17:56+5:30

सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील पुलाखाली ट्रॅक्टर पडून चार मजुरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Four workers die after falling under a bridge | वाहन पुलाखाली पडून चार मजुरांचा मृत्यू

वाहन पुलाखाली पडून चार मजुरांचा मृत्यू

गोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील पुलाखाली ट्रॅक्टर पडून चार मजुरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी सकाळी 9 वाजता घडली. मजूर घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टरला मागून दुसर्‍या ट्रॅक्टरने धडक दिल्याने समोरचा ट्रॅक्टर पुलाखाली पडला. सदर घटनेची माहिती मिळताच मा. आमदार राजकुमार बडोले (माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री गोंदिया) यांनी पोलीस अधिकारी व आरोग्य अधिकारी  यांच्याशी संपर्क साधून तपास यंत्रणा व रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पाठविण्याचे निर्देश दिले.
अपघाती मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत एक लाख रुपये आणि जखमी व्यक्तींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा मा. आमदार राजकुमार बडोले (माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री गोंदिया) यांनी केली.

Web Title: Four workers die after falling under a bridge