चार कोरोना बाधीत कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:00:45+5:30

बाहेरील जिल्हा व राज्यात रोजगार आणि नोकरीसाठी गेलेले नागरिक स्वगृही परतण्याचे प्रमाण आता बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. मागील दोन महिन्यात बाहेरील जिल्हा आणि राज्यातून जिल्ह्यात एकूण ४५ हजार नागरिक परत आले आहे. तर आता बाहेरुन येणाऱ्यांचे प्रमाण सुध्दा नगन्य आहे. शिवाय जिल्हा प्रशासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागल्यानंतर त्यांनी सुध्दा काटेकोर उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे.

Four corona free corona free | चार कोरोना बाधीत कोरोनामुक्त

चार कोरोना बाधीत कोरोनामुक्त

ठळक मुद्देजिल्ह्यात आता दोन कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण : १३ दिवसात ६७ जण कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना बाधित कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी (दि.८) पुन्हा चार कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले. त्यामुळे मागील १३ दिवसांच्या कालावधीत एकूण ६७ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात आता दोन कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे. त्यामुळे पुढील दोन तीन दिवसात जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी आनंदाची बातमी आहे.
बाहेरील जिल्हा व राज्यात रोजगार आणि नोकरीसाठी गेलेले नागरिक स्वगृही परतण्याचे प्रमाण आता बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. मागील दोन महिन्यात बाहेरील जिल्हा आणि राज्यातून जिल्ह्यात एकूण ४५ हजार नागरिक परत आले आहे. तर आता बाहेरुन येणाऱ्यांचे प्रमाण सुध्दा नगन्य आहे. शिवाय जिल्हा प्रशासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागल्यानंतर त्यांनी सुध्दा काटेकोर उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील सर्वच सीमा तपासणी नाक्यांवर बाहेरुन येणाºयांची आरोग्य तपासणी केली जात आहे. शिवाय गावात सुध्दा बाहेरुन येणाऱ्याना होम क्वारंटाईन अथवा गावातील शाळेत क्वारंटाईन करुन ठेवले जात आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यात प्रशासनाला बऱ्याच प्रमाणात यश आले आहे. दुसरी दिलासायक बाब म्हणजे जिल्ह्यातील कोरोना बाधीत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे मागील १३ दिवसात जिल्ह्यातील एकूण ६७ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले. तर गेल्या सहा दिवसात जिल्ह्यात एकही नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. सोमवारी जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेले चार कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. सुटी दिल्यानंतर या सर्वांचे समुपदेशन करुन त्यांना सात दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला. जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये आता केवळ दोन कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ते देखील उपचाराला चांगला प्रतिसाद देत असून त्यांना सुध्दा पुढील दोन तीन दिवसात सुटी देण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे गोंदिया जिल्हा येत्या दोन तीन दिवसात पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी दिलादादायक बाब आहे.

सहा दिवसात नवीन रुग्णाची नोंद नाही
जिल्ह्यात आता दोन कोरोना बाधित असून त्यांना सुध्दा दोन तीन दिवसात सुटी मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. मागील सहा दिवसात जिल्ह्यात नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण सुध्दा बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आता जिल्हा प्रशासनाला अधिक काटेकोरपणे उपाययोजना करण्याची गरज आहे.

१०२८ नमुने कोरोना निगेटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडीफार लक्षणे दिसताच अशा रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले जाते. त्यानंतर त्यांचे स्वॅब नमुने घेऊन ते नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले जातात. आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण १०९७ जणांचे स्वॅब नमुने घेवून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.त्यापैकी ६९ नमुने कोरोना पॉझिटिव्ह तर १०२८ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.

Web Title: Four corona free corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.