शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

४८ हजार महिलांनी साधली प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचतगट आहेत. ४१६ गावांमध्ये पाच हजार ३२३ बचतगट आहेत. तिरोडा व गोंदिया या दोन शहरात ६७८ गट असे एकूण सहा हजार एक गट आहेत. बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ६७ हजार ९१८ महिला जुळलेल्या आहेत.

ठळक मुद्दे९९ टक्के कर्जाची परतफेड : ४९ कोटींची महिलांनी केली बचत

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महिला आत्मनिर्भर व्हाव्या यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाते. आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यातील ७५ हजार ४३९ महिला बचत गटाशी जुळल्या आहेत. परंतु बचत गटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जातून जिल्ह्यातील ४८ हजार महिलांनी आपली आर्थिक प्रगती साधली आहे. त्यात सर्वाधिक महिला शेतीविषयक जोडधंदा करीत आहेत.जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचतगट आहेत. ४१६ गावांमध्ये पाच हजार ३२३ बचतगट आहेत. तिरोडा व गोंदिया या दोन शहरात ६७८ गट असे एकूण सहा हजार एक गट आहेत. बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ६७ हजार ९१८ महिला जुळलेल्या आहेत. तर शहरी भागातील सात हजार ५२१ महिला अशाप्रकारे जिल्ह्यातील ७५ हजार ४३९ महिला बचत गटांशी जुळल्या आहेत. परंतु यापैकी ४८ हजार महिलांनी वारंवार कर्ज घेऊन त्यांची नियमित परतफेड करून आपली प्रगती साधली आहे.गोंदिया जिल्ह्यातील महिला एकत्र येऊन दर महिन्याला पैसे जमा करतात ती बचत आजघडीला ४८ कोटी ७१ लाखांची झाली आहे. बचत गटाच्या महिलांनी आपसात घेतलेल्या कर्जाची रक्कम २३८ कोटी ३३ लाख असून त्याला आंतरीक कर्ज संबोधले जाते. बँक कर्ज मिळालेल्या बचत गटांची संख्या पाच हजार ३३८ आहे. त्यांना १५५ कोटी सात लाख रूपये कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. बँकेतून घेतलेला चालू कर्ज व्यवहार ५३ कोटी ६३ लाखांचा आहे. घेतलेले कर्ज मोठ्या प्रमाणात असले तरी गोंदिया जिल्ह्यातील बचत गटांची कर्ज परतफेड ९९ टक्के आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक बचत गटाला १५ हजार रूपयांप्रमाणे तीन हजार ३० बचत गटांचा फिरता निधी चार कोटी ५४ लाख देण्यात आला आहे. शहरातील बचत गटांना १० हजार रूपयांप्रमाणे ५६४ बचत गटाचा फिरता निधी ५६ लाख ४० हजार आहे. खिशात कवडी नसताना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन त्यातून पैसे कमविणे आणि कर्जाचे हप्ते नियमित भरीत आज बचत गटाच्या महिला लखपती झाल्या आहेत. स्वयंरोजगारातून आर्थिक विकास त्या महिलांनी साधला आहे.५० हजारावर महिलांनी पत्करला शेतीपूरक व्यवसायगोंदिया जिल्ह्यात ग्रामसंस्थांची संख्या ३८४ आहे. तर शहरीभागात वस्तीस्तर संघांची संख्या ४७ आहे. शेती पूरक व्यवसाय करणाºया ५० हजार ६५९ महिला जिल्ह्यात आहेत. तर १५ हजार ४७१ महिला बिगरशेती पूरक व्यवसाय करीत आहेत. वस्तीस्तर संघाला ५० हजार रूपये प्रत्येक गटाला अशा १३ गटांना फिरता निधी सहा लाख ५० हजार, ग्रामसंस्था संघाला सामूदायीक गुंतवणूक निधी ग्रामसंस्थाना प्रतिग्राम संस्था तीन लाख ५५ हजार रूपये प्रमाणे २१४ ग्रामसंस्थाना सहा कोटी ४२ लाख, ग्रामसंस्थाना अतिजोखीम प्रवण निधी ७५ हजार रूपये प्रत्येकी असा १०४ ग्रामसंस्थाना ७८ लाख रूपये वाटप करण्यात आले आहे.बचत गटांनी कर्ज घेऊन त्या कर्जाची नियमित परतफेड केली. त्यातून मोठ्या प्रमाणात महिलांना पुन्हा कर्ज उपलब्ध झाले. जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांनी घेतलेले कर्ज कोट्यवधीच्या घरात असले तरी त्या कर्जाची परतफेड ९९ टक्के आहे.-सुनील सोसेसमन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ 

टॅग्स :Socialसामाजिक