४८ हजार महिलांनी साधली प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 05:00 IST2020-03-16T05:00:00+5:302020-03-16T05:00:08+5:30

जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचतगट आहेत. ४१६ गावांमध्ये पाच हजार ३२३ बचतगट आहेत. तिरोडा व गोंदिया या दोन शहरात ६७८ गट असे एकूण सहा हजार एक गट आहेत. बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ६७ हजार ९१८ महिला जुळलेल्या आहेत.

Forty Eight Thousands of women achieved progress | ४८ हजार महिलांनी साधली प्रगती

४८ हजार महिलांनी साधली प्रगती

ठळक मुद्दे९९ टक्के कर्जाची परतफेड : ४९ कोटींची महिलांनी केली बचत

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महिला आत्मनिर्भर व्हाव्या यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाते. आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यातील ७५ हजार ४३९ महिला बचत गटाशी जुळल्या आहेत. परंतु बचत गटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जातून जिल्ह्यातील ४८ हजार महिलांनी आपली आर्थिक प्रगती साधली आहे. त्यात सर्वाधिक महिला शेतीविषयक जोडधंदा करीत आहेत.
जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचतगट आहेत. ४१६ गावांमध्ये पाच हजार ३२३ बचतगट आहेत. तिरोडा व गोंदिया या दोन शहरात ६७८ गट असे एकूण सहा हजार एक गट आहेत. बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ६७ हजार ९१८ महिला जुळलेल्या आहेत. तर शहरी भागातील सात हजार ५२१ महिला अशाप्रकारे जिल्ह्यातील ७५ हजार ४३९ महिला बचत गटांशी जुळल्या आहेत. परंतु यापैकी ४८ हजार महिलांनी वारंवार कर्ज घेऊन त्यांची नियमित परतफेड करून आपली प्रगती साधली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील महिला एकत्र येऊन दर महिन्याला पैसे जमा करतात ती बचत आजघडीला ४८ कोटी ७१ लाखांची झाली आहे. बचत गटाच्या महिलांनी आपसात घेतलेल्या कर्जाची रक्कम २३८ कोटी ३३ लाख असून त्याला आंतरीक कर्ज संबोधले जाते. बँक कर्ज मिळालेल्या बचत गटांची संख्या पाच हजार ३३८ आहे. त्यांना १५५ कोटी सात लाख रूपये कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. बँकेतून घेतलेला चालू कर्ज व्यवहार ५३ कोटी ६३ लाखांचा आहे. घेतलेले कर्ज मोठ्या प्रमाणात असले तरी गोंदिया जिल्ह्यातील बचत गटांची कर्ज परतफेड ९९ टक्के आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक बचत गटाला १५ हजार रूपयांप्रमाणे तीन हजार ३० बचत गटांचा फिरता निधी चार कोटी ५४ लाख देण्यात आला आहे. शहरातील बचत गटांना १० हजार रूपयांप्रमाणे ५६४ बचत गटाचा फिरता निधी ५६ लाख ४० हजार आहे. खिशात कवडी नसताना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन त्यातून पैसे कमविणे आणि कर्जाचे हप्ते नियमित भरीत आज बचत गटाच्या महिला लखपती झाल्या आहेत. स्वयंरोजगारातून आर्थिक विकास त्या महिलांनी साधला आहे.

५० हजारावर महिलांनी पत्करला शेतीपूरक व्यवसाय
गोंदिया जिल्ह्यात ग्रामसंस्थांची संख्या ३८४ आहे. तर शहरीभागात वस्तीस्तर संघांची संख्या ४७ आहे. शेती पूरक व्यवसाय करणाºया ५० हजार ६५९ महिला जिल्ह्यात आहेत. तर १५ हजार ४७१ महिला बिगरशेती पूरक व्यवसाय करीत आहेत. वस्तीस्तर संघाला ५० हजार रूपये प्रत्येक गटाला अशा १३ गटांना फिरता निधी सहा लाख ५० हजार, ग्रामसंस्था संघाला सामूदायीक गुंतवणूक निधी ग्रामसंस्थाना प्रतिग्राम संस्था तीन लाख ५५ हजार रूपये प्रमाणे २१४ ग्रामसंस्थाना सहा कोटी ४२ लाख, ग्रामसंस्थाना अतिजोखीम प्रवण निधी ७५ हजार रूपये प्रत्येकी असा १०४ ग्रामसंस्थाना ७८ लाख रूपये वाटप करण्यात आले आहे.

बचत गटांनी कर्ज घेऊन त्या कर्जाची नियमित परतफेड केली. त्यातून मोठ्या प्रमाणात महिलांना पुन्हा कर्ज उपलब्ध झाले. जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांनी घेतलेले कर्ज कोट्यवधीच्या घरात असले तरी त्या कर्जाची परतफेड ९९ टक्के आहे.
-सुनील सोसे
समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ
 

Web Title: Forty Eight Thousands of women achieved progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.