शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन कालावधील वीजबिल माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST

तिरोडा : शासनाने लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी व सरकारच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी १५ फेब्रुवारीला विदर्भात सर्व ...

तिरोडा : शासनाने लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी व सरकारच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी १५ फेब्रुवारीला विदर्भात सर्व तालुका व जिल्हा ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. थकीत वीजबिलामुळे वीज कनेक्शन कट करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा सामूहिक विरोध करावा, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सांगितले.

विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक स्थानिक विठ्ठल-रखुमाई मंदिर खाम तलाव येथे रविवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी महिला आघाडी विदर्भ प्रदेश अध्यक्ष रंजना मामर्डे, गोंदिया जिल्हा कोर कमिटी सदस्य सुरेश धुर्वे, तिरोडा तालुका शहराध्यक्ष रिंकूजी तिवारी, नरेंद्र रहांगडाले, संतोष बरबटे, अशोक राऊत, कमल कापसे, डी.आर. गिरीपुंजे, अंतू बागडे, अखिलेश शुक्ला, महेंद्र तिवारी, राज ठाकरे, किरण कुमार पारधी, बाबुलाल बिसेन, विलास धनकट, नितेश शेंडे, सदाशिव बागडे, रवी शेंडे, शरद राव धनकट, राजेंद्र तिडके अशा प्रकारे मोठ्या संख्येने विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. कोरोना काळातील वीजबिल सरकारने भरावे, वीज कनेक्शन कापणे हे जनतेवर अन्यायकारक आहे. कोरोना ही नैसर्गिक आपत्ती होती, नैसर्गिक संकट होते, सरकारने तीन महिने लॉकडाऊन लावले होते, म्हणून उद्योग, व्यापार, रोजगार बंद होता. जनतेजवळ पैसा उरलेला नव्हता, म्हणून कोरोना काळातील संपूर्ण वीजबिल सरकारने भरले पाहिजे, ही विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी आहे. यासाठीच विदर्भ राज्य आंदोलन समिती विदर्भभर जिल्हा व तालुका स्तरावर सरकारच्या वीज कनेक्शन कापण्याच्या निर्णयाविरोधात १५ फेब्रुवारीला धरणे आंदोलन करणार असल्याचे नेवले यांनी सांगितले.

......

शासनाला आश्वासनाचा विसर

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी १०० युनिट माफ करण्याच्या नंतर २ वर्षांतील फरक माफ करण्याच्या दिवाळीच्या दिवशी मोठी भेट देण्याची घोषणा केली होती, परंतु त्यांच्या घोषणा सर्व फोल निघाल्या. जनतेच्या विरोधात घोषणा केल्या, निवडणूक जाहीरनाम्यातही शिवसेनेने ३०० युनिटपर्यंत ३० टक्‍के वीजबिल माफीचे आश्वासन दिले होते, त्याचाही शासनाला विसर पडला आहे.

...

विदर्भावर अन्याय

वीज, पाणी, जमीन विदर्भाची लागून ७० टक्के वीज विदर्भात तयार होते व वरून प्रदूषणही विदर्भाच्या जनतेला म्हणून विदर्भातील वीज ग्राहकांना २०० युनिटपर्यंत वीज फ्री द्या, नंतरचे वीजदर निम्मे करा, शेती पंपाला वीजबिलातून सूट द्या, यावर त्वरित निर्णय घ्यावा, यासाठीही हे आंदोलन करण्यात येत आहे.