शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

पाच एकरातील रोवणी सडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

रामाटोला (अंजोरा) येथील गट क्रमांक ७०१ मधून कालव्याचे पाणी जाण्यासाठी कालव्याला पाईप बसविण्यात आले आहे. या कालव्यावर बसविण्यात आलेले पाईप फुटले असल्याने पावसाळ्यात किंवा कालवा सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना अडचण निर्माण होईल अशी लेखी तक्रार शेतकऱ्यांनी आमगावचे अभियंता यांच्याकडे केली होती. परंतु पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष न दिल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पाच एकरातील रोवणी सडली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी दोन महिन्यापूर्वी केली होती तक्रार : पाटबंधारे विभागाने द्यावी नुकसान भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पुजारीटोला धरणातून वाहून जाणाऱ्या कालव्याचे पाईप दुरूस्त न केल्याने आठ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी वाहून जात आहे. परिणामी पाच एकरातील रोवणी सडल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.रामाटोला (अंजोरा) येथील गट क्रमांक ७०१ मधून कालव्याचे पाणी जाण्यासाठी कालव्याला पाईप बसविण्यात आले आहे. या कालव्यावर बसविण्यात आलेले पाईप फुटले असल्याने पावसाळ्यात किंवा कालवा सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना अडचण निर्माण होईल अशी लेखी तक्रार शेतकऱ्यांनी आमगावचे अभियंता यांच्याकडे केली होती. परंतु पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष न दिल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पाच एकरातील रोवणी सडली आहे. यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने रोवणी करण्यासाठी म्हणून बाघ पाटबंधारे विभागाचा पुजारीटोला धरणातून जाणाऱ्या कालव्याला पाणी सोडण्यात आले. मागील आठ दिवसांपासून कालवा सुरू असल्यामुळे रामाटोला येथील या पाईपला मोठे भगदाळ पडले आहे.परिणामी मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. राजू श्रीराम चौधरी, अशोक श्रीराम चौधरी, वसंत चौधरी, सोमा परतेती व मदन शिवपूरी या पाच शेतकऱ्यांची पाच ते सहा एकर रोवणी सडली. यासंदर्भात पाटबंधारे विभागाला कळवूनही त्यांनी लक्ष दिले नाही. ते पाईप दुरूस्त करून नुकसान झालेल्या शेतकºयांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा माजी जि.प.सदस्य रमेश उर्फ छोटू बहेकार यांनी दिला आहे.

टॅग्स :floodपूरagricultureशेती