शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसाने मान्सूनपूर्व कामांची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:00 IST

दरवर्षी नगर परिषदेकडून मान्सूनपूर्व कामे केली जातात. यात प्रामुख्याने शहरातील गटारे, नाल्या, नाला यातील गाळाचा उपसा करुन पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची काळजी घेतली जाते. अन्यथा जोराचा पाऊस झाल्यास शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मान्सूनपूर्व कामासाठी नगर परिषदेला निधी सुध्दा उपलब्ध करुन दिला जातो. तसेच ही कामे साधारणपणे मे महिन्यापूर्वीच केली जातात.

ठळक मुद्देरस्त्यांवर साचले पाणी : नाल्यांच्या साफसफाईचा अभाव, वेळकाढू धोरणाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात मंगळवारी (दि.२) सकाळच्या सुमारास जवळपास पंधरा ते वीस मिनिटे पाऊस झाला. थोड्या वेळ झालेल्या पावसामुळे मात्र शहरातील रस्त्यांवर आणि भाजीबाजारात पाणी साचले. पंधरा मिनिटे पाऊस झाला तर हे हाल आहेत तर किमान तासभर पाऊस झाल्यास शहराची काय अवस्था होईल याचा विचार न केलेलाच बरा. मात्र पहिल्या पावसामुळे नगर परिषदेच्या मान्सूनपूर्व कामाची पोलखोल झाली आहे.दरवर्षी नगर परिषदेकडून मान्सूनपूर्व कामे केली जातात. यात प्रामुख्याने शहरातील गटारे, नाल्या, नाला यातील गाळाचा उपसा करुन पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची काळजी घेतली जाते. अन्यथा जोराचा पाऊस झाल्यास शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मान्सूनपूर्व कामासाठी नगर परिषदेला निधी सुध्दा उपलब्ध करुन दिला जातो. तसेच ही कामे साधारणपणे मे महिन्यापूर्वीच केली जातात. मात्र यंदा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने आणि नगर परिषदेची यंत्रणा दुसऱ्या कामात व्यस्त असल्याने मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करणे शक्य झाले नाही. त्याचा परिणाम मंगळवारी सकाळी शहरात थोडाच पाऊस झाल्यावर दिसून आला. शहरातील भाजीबाजार, नेहरु चौक, सिव्हिल लाईनसह इतर भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळेच शहरातील नाल्या आणि गटारांची अद्यापही पूर्णपणे साफ सफाई झाली नसल्याची बाब पुढे आली. विशेष म्हणजे अद्याप पावसाळ्याला तशी सुरूवात झाली नाही. मात्र थोड्याच पावसाने शहराचे हे हाल झाले तर भर पावसाळ्यात काय स्थिती राहील याची चिंता शहरवासीयांना आतापासूनच सतावित आहे.नगर परिषदेच्या नियोजनाचा अभावकोरोनामुळे यंदा नगर परिषदेची यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दुसºया कामात गुंतविण्यात आली.तर मान्सूनपूर्व कामे सुरू करण्यासाठी नगर परिषदेला जिल्हा प्रशासनाची अद्यापही मंजूरी मिळाली नसल्याची माहिती आहे.त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात शहराचे हाल बिकट झाल्यास त्याला प्रशासनच जबाबदार राहणार यात शंका नाही.भर पावसाळ्यात कशी करणार कामेहवामान खात्याने यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचा आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर नगर परिषदेने अद्यापही मान्सूनपूर्व कामे पूर्ण केलेली नाही.त्यामुळे पावसाळ्यात नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी साचण्याची शक्यता आहे. तर नगर परिषद भर पावसाळ्यात नाल्यांची सफाई कशी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसMuncipal Corporationनगर पालिका