मनाला आनंद देणारे फटाके देतात गंभीर आजार
By Admin | Updated: October 22, 2014 23:20 IST2014-10-22T23:20:09+5:302014-10-22T23:20:09+5:30
दिवाळी हा आनंद आणि उत्साहाला उधान आणणाला सण. दिवाळी आणि फटाके हे समीकरण इतके घट्ट जुळलेले आहे की फटाक्याशिवाय दिवाळी ही कल्पनाच करता येत नाही. परंतु मनाला आनंद

मनाला आनंद देणारे फटाके देतात गंभीर आजार
गोंदिया : दिवाळी हा आनंद आणि उत्साहाला उधान आणणाला सण. दिवाळी आणि फटाके हे समीकरण इतके घट्ट जुळलेले आहे की फटाक्याशिवाय दिवाळी ही कल्पनाच करता येत नाही. परंतु मनाला आनंद देणारे हेच फटाके एखाद्याच्या जीवनात कायमचे नैराश्य आणू शकते. त्यामुळे क्षणिक आनंद देणाऱ्या या फटाक्यांपासून सावध राहणे गरजेचे असल्याचा सल्ला वैद्यकीय व्यवसायातील तज्ज्ञ देत आहेत.
फटाक्यांचा शोध साधारणत: २ हजार वर्षापूर्वी चीनमध्ये लागला. आता तर आॅस्ट्रेलिया व अमेरीकेत विशिष्ट उत्सवाच्या वेळी मोठमोठे फटाका-शो संगणकाद्वारे संचालित केले जातात. फटाके फुटल्यावर त्यातून निघणारा रासायनिक पदार्थ मानवाच्या जीवनावर विपरीत परिणाम करणारा आहे. फटाक्यामधून धूर, सल्फर डॉयआॅक्साईड व नाईट्रोजन आॅक्साईड तसेच कार्बन मोनाआॅक्साईड, शिसे आणि तांबे बोहर पडते. धुरामध्ये बारीक रासायनिक व अरासायनिक पदार्थाचे कण असतात. ते सूक्ष्म कण लेसदैन २.५ मायक्रो मीटरपेक्षाही कमी असल्याने श्वासद्वारे घश्यात व फुफुसात जातात. ते शरीरात गेल्यावर फॅरीन्जायटीस, लॅरीन्जायटीस, सायनुसायटीस, ब्रॉकायटीस व न्युमोनियासारखे गंभीर आजार जडतात. त्यात जीवनाला मोठा धोका असतो. कधी- कधी या फटक्यामुळे रूग्णांची छाती आवळल्यासारखी होते. लोकांना गुदमरल्यासारखेही वाटते.
ज्यांना अस्थमा आहे त्यांना त्रास उमळून येतो. कधी- कधी ते गंभीरही होतात. हृदयरूग्णांना झटका येवू शकतो. रक्तदाब वाढू शकतो, डोळ्यांनाही एलर्जी होवू शकते, या फटाक्यातून सल्फर डायआॅक्साईड गॅस निघतो. त्यातील सल्फ्युरीक अॅसीड हे आम्ल असल्याने त्याला पाण्याचे विशेष आकर्षण आहे.
हे अॅसीड पावसाच्या पाण्यासोबत धरतीवर पडते, त्याला अॅसीडचा पाउस असे म्हटले जाते. या अॅसीडच्या पावसामुळे पृथ्वीवरील प्राणीमात्रा, जीव जंतु व विविध वनस्पती नष्ठ होतात. कार्बन मोनॉॅक्साईड हे श्वासाद्वारे फुफुसात जाते, रक्तात मिसळते व रूग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. यातच रूग्ण अतिगंभीर होतो. या फटक्यामधून निघणारे शिसे श्वासद्वारे रक्तात जातात त्यामुळे व्यक्तीच्या मेंदुवर सुज येते. मज्जातंतुची वाढ खुंटते, ६ वर्षाखालील मुले या फटाक्यामुळे विक्षीतपणे वागतात. गर्भवती महिलेच्या रक्तात हे शिसे गेले तर ते प्लॉसन्टामधून बाळाच्या मेंदूत जाते व बाळाच्या मेंदूची वाढ खुंटते. या असे डॉ.शशांक डाये यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी या संदर्भात घडणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती दिली.
फटाक्यामुळे डोळयाला इजा होणे, अंधत्व येते. त्यामुळे शक्यतोवर फटाके फोडु नये असे सांगत फटाक्यांनी एखाद्या भाजला तर त्यांनी तो भाग बर्फाच्या पाण्यात १० ते १५ मिनिटे ठेवावा. डोळ्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवावी व लगेच डॉक्टरकडे जावे, शक्यतोवर फटाके फोडू नये, फुलझड्या किंवा टिकल्या वापराव्यात असा सल्ला तज्ज्ञ देतात. (तालुका प्रतिनिधी)