VIDEO: गोंदियात झी महासेलच्या इमारतीला भीषण आग; आगीच्या लोटांनी परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 19:20 IST2022-03-18T19:19:03+5:302022-03-18T19:20:11+5:30
शहरातील गोरेलाल चौकातील झी महासेलच्या इमारतीला आग लागली आग ही घटना आज सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

VIDEO: गोंदियात झी महासेलच्या इमारतीला भीषण आग; आगीच्या लोटांनी परिसरात खळबळ
गोंदिया-
शहरातील गोरेलाल चौकातील झी महासेलच्या इमारतीला आग लागली आग ही घटना आज सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी गोंदिया आणि तिरोडा अग्निशमन दलाची मदत घेतली जात आहे. मागील पाऊण तासापासून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
गोंदिया: शहरातील गोरेलाल चौकातील झी महासेलच्या इमारतीला भीषण आग pic.twitter.com/eCNJ7Hf0eF
— Lokmat (@lokmat) March 18, 2022
शहरातील गोरेलाल चौक परिसरातील एका हाँटेल लगत झी महासेल आहे. झी महासेलची इमारत वर्दळीच्या ठिकाणी आहे. सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास या इमारतीतून धूर निघतांना काही नागरिकांना दिसला. त्यांनी लगेच याची माहिती अग्निशमन दल आणि शहर पोलीस स्टेशन स्टेशनला दिली. त्यानंतर गोंदिया अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने आणि लगतच्या इमारतीना आग लागण्याची शक्यता वाढल्याने तिरोडा नगर परिषद अग्निशमन आणि अदानी वीज प्रकल्पाच्या अग्निशमन वाहनाची मदत घेण्यात आली. सांयकाळी ७ वाजतापर्यंत १५ अग्निशमन वाहनांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाचा प्रयत्न करण्यात आले. पण आग आटोक्यात आली नव्हती. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरुच होते. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही. मात्र आगीत झी महासेलचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही. घटनास्थळी पोलीस, माजी आ.राजेंद्र जैन लक्ष पोहचून मदत कार्य सुरु केले होते.
लागली आग ही घटना आज सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी गोंदिया आणि तिरोडा अग्निशमन दलाची मदत. मागील पाऊन तासापासून आग आटोक्यात आणण्यासाचा प्रयत्न. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती.