घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा तलाठी शोधणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 21:04 IST2017-10-09T21:04:29+5:302017-10-09T21:04:42+5:30
गोंदिया शहरातील कचºयाचे व्यवस्थापन करण्यासाठी जागा शोधण्याचे काम तलाठ्यांवर सोपविण्यात आले. यावेळी जागा मिळेल अशी शक्यता आहे.

घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा तलाठी शोधणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया शहरातील कचºयाचे व्यवस्थापन करण्यासाठी जागा शोधण्याचे काम तलाठ्यांवर सोपविण्यात आले. यावेळी जागा मिळेल अशी शक्यता आहे. मागील १५ वर्षापासून गोंदिया नगर परिषदेचे अधिकारी जागा शोधता-शोधता त्रस्त झाले आहेत.
गोंदिया शहरात दररोज ४२ टन कचरा जमा होतो. आधी हा कचरा गणेशनगर येथील कृष्णपुरा वार्डात टाकला जात होता. हा परिसर आधी खाली होता आता हा परिसर समतल झाला आहे. आता मोक्षधाम परिसरात कचरा टाकला जात आहे. शहरातील इतर भागातही कचरा टाकून समतल भाग केला जात आहे.१५ वर्षापासून अनेकवेळा सर्वोच्च न्यायालयाने कचºयाचे नियोजन करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले. गोंदिया नगर परिषदने अनेक वर्षापासून घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा शोधण्याची मोहीम सुरू आहे. परंतु जागा शोधण्यात नगर परिषदेला यश आले नाही.
गोंदिया नगर परिषदेने सर्वात आधी टेमनी ग्राम पंचायत अंतर्गत जागा मंजूर करवून घेतली होती. परंतु नागरिकांनी विरोध केल्यामुळे ती जागा सोडण्यात आली. त्यानंतर रापेवाडा, फूलचूर, कटंगी या ठिकाणी जागा शोधण्यात आली. परंतु काही कारणामुळे ही जागा सुध्दा नगर परिषदमिळूशकली नाही. आता जिल्हाधिकाºयांनी तहसीलदार यांना जागा शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तलाठ्यांच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनासाठी ८-१० एकर जमीनीची गरज आहे. आता जागा मिळेल अशी, आशा नगर परिषदेच्या अधिकाºयांना आहे.
काय आहेत समस्या?
टेमनी येथील शोधण्यात आलेल्या जमीनीचे भाव लाखो रूपयाचे होते. आता त्या जमीनीचे भाव दुप्पट झाले.एवढा दर नगर परिषद चुकवू शकत नाही. नगर परिषदेला शासकीय दराने जमीन हवी परंतु तसे होणार नाही हे निश्चीत.
मोठा लाभ होणार
घनकचरा व्यवस्थापन होईल त्या ठिकाणी कचºयापासून रासायनिक खत तयार करण्याचा प्रकल्प तयार केला जाणार आहे. हा प्रकल्प नगर परिषदेला लाभ देणारा आहे.
जिल्हाधिकारी यांनी तहसीलदाराच्या माध्यमातून तलाठ्यांना दोन-तीन ठिकाणी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशदेण्यात आले. यावेळी जागेची व्यवस्था होईल अशी आशाआहे.
गणेश हथकैय्या
आरोग्य निरीक्षक, नगर परिषद गोंदिया.