शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्यांना’ पाठविली नोटीस

By admin | Updated: August 31, 2015 01:40 IST

मारहाण करण्यात येत असल्याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार केल्याच्या तब्बल सहा दिवसांनंतर बुधवारी (दि.२६) पालिका प्रशासनाकडून शाळेच्या मुख्याध्यापक ...

विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरण : लोकमतच्या पाठपुराव्याचा परिणामगोंदिया : मारहाण करण्यात येत असल्याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार केल्याच्या तब्बल सहा दिवसांनंतर बुधवारी (दि.२६) पालिका प्रशासनाकडून शाळेच्या मुख्याध्यापक व पर्यवेक्षकाला कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आले. साधे नोटीस देण्यासाठी सहा दिवसांचा अवधी लागत असल्याने पालिका प्रशासन विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊन किती तत्पर आहे, हे या प्रकारातून दिसून येते. शहरातील गोविंदपूर परिसरात असलेल्या नगर परिषद शाळेतील पर्यवेक्षक अनुराग तिवारी हे विद्यार्थ्यांना काडीने मारतात. विद्यार्थ्यांना शिकविणे सोडून आपल्या घरच्या गोष्टी सांगतात. तसेच विद्यार्थ्यांचे मायबाप काढून त्यांना टीसी देण्याची व सर्व नगरसेवक ओळखीचे असून कुणीही काही करू शकत नसल्याची धमकावणी देतात. पोषण आहारात अळ््या निघतात. शिवाय बेंच तुटलेले, पंखे नादुरूस्त, शौचालय वापरण्यासारखे नाही, विषयांचे शिक्षक नाहीत असे असतानाही कुणालाही काही सांगायचे नाही असे ते विद्यार्थ्यांना धमकावितात. या प्रकाराची वाच्यता खुद्द शाळेतील २५-३० विद्यार्थ्यांनी २१ आॅगस्ट रोजी पालिका कार्यालयात धडक देऊन प्रशासनीक अधिकारी सी.ए.राणे यांच्याकडे केली होती. यावर राणे यांनी शाळेचे मुख्याध्यापक विजय शर्मा व पर्यवेक्षक तिवारी यांना नोटीस देणार असल्याचे सांगीतले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी लगेच मुख्याध्यापक व पर्यवेक्षकाला नोटीस देणे गरजेचे होते. मात्र पालिका प्रशासनाला हे नोटीस देण्यासाठी तब्बल सहा दिवसांचा अवधी लागला. त्यांनी बुधवारी (दि.२६) मुख्याध्यापक व पर्यवेक्षकाला नोटीस दिले. यातून पालिका प्रशासन विद्यार्थ्यांना घेऊन किती तत्पर आहे हे दिसून येते. तर या प्रकरणात आता कारवाई केली जाते की कारवाईच्या नावावर फक्त थातूरमातूर खेळ खेलला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)