शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर न.प. कर्मचारी पतसंस्था बरखास्त

By admin | Updated: September 27, 2014 23:19 IST

गोंदिया नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सात संचालकांना काही दिवसांपूर्वी सहायक उपनिबंधकांनी बर्खास्त केले होते. त्यामुळे पतसंस्थेचे संचालक मंडळ अल्पमतात आले होते.

गोंदिया : गोंदिया नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सात संचालकांना काही दिवसांपूर्वी सहायक उपनिबंधकांनी बर्खास्त केले होते. त्यामुळे पतसंस्थेचे संचालक मंडळ अल्पमतात आले होते. शेवटी सहायक निबंधक (सहकारी संस्था) राजेंद्र वाघे यांनी ही पतसंस्था बरखास्त करण्याचा निर्णय घेऊन तसा आदेश २३ सप्टेंबरला जारी केला आहे. आता या पतसंस्थेचा कार्यभार संभाळण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्ष २००९ मध्ये नगर परिषद सहकारी पतसंस्थेची निवडणूक झाली होती. त्यात १६ संचालकांची निवड करण्यात आली होती. ही पतसंस्था नगर परिषदेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आहे. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कर्ज वाटून व्याजाची वसूली करीत होती. निवडण्यात आलेल्या १६ संचालकांपैकी सुशिला राठोड यांनी सुटी घेतल्याने त्यांचे संचालकपद रद्द करण्यात आले होते. पुरूषोत्तम गाडकिने यांची बदली झाल्याने त्यांना संचालक पदावरून दूर करण्यात आले. दिनेश तावाड़े यांचे निधन झाल्याने त्यांचे नाव संचालकपदावरून दूर झाले. याशिवाय तिलक दीप, अनुप बैरीसाल, अमित श्रीवास्तव यांनी कर्ज घेऊनही ती रक्कम परत न केल्याने त्यांना संचालकपदावरून बरखास्त करण्यात आले होते.तसेच माया माटे, राजू शेंद्रे, शिवनाथ मालाधरी, मदन बघेले यांना अग्रीम रक्कम परत न केल्याच्या कारणातून संचालकपद गमवावे लागले होते. विशेष म्हणजे अजयसिंह गौर हे पतसंस्थेचे अध्यक्ष असताना त्यांनी एक प्रमाणपत्र सादर केले होते. हे प्रकरण समोर आल्याने त्यांनाही संचालकपद गमवावे लागले. प्रमोद सोनवाने, संजय रहांगडाले, उमाशंकर शर्मा यांनीही आपल्या पदांचा राजीनामा २२ सप्टेंबरला दिला. संचालक मंडळ अल्पमतात असल्याने त्यामुळे संस्थेचे कामकाज चांगल्या प्रकारे चालविणे कठीण असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे छेदीलाल इमलाह आणि राजेंद्र लिल्हारे यांचेही संचालकपद रद्द करून सहायक निबंधकांनी यू.एस. हलमारे यांची अधिकारी म्हणून नियुक्ती केली. (तालुका प्रतिनिधी)