कुडव्यात दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:30+5:302021-01-13T05:15:30+5:30
गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चंद्रमणी बुद्धविहार कुडवा येथे दोन गटात हाणामारी झाल्याने दोन्ही गटांवर रामनगर पोलिसांनी गुन्हा ...

कुडव्यात दोन गटात हाणामारी
गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चंद्रमणी बुद्धविहार कुडवा येथे दोन गटात हाणामारी झाल्याने दोन्ही गटांवर रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
इंदू विशालदीप रामटेके (५०) व विशालदीप रामटेके (५५) व अभिषेक विशालदीप रामटेके या तिघांना आरोपींनी काठीने मारहाण केल्याची घटना ९ जानेवारीच्या सायंकाळी ८ वाजता घडली. इंदू रामटेके या घराच्या अंगणात स्वयंपाक करीत असताना आरोपींनी इंदू यांना तुम्ही ‘उदीराम रामटेके याला साथ देता’ असे बोलून अश्लील शिवीगाळ करून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून चाकू व विळा घेऊन त्यांच्या घरासमोर आले. त्यांनी अभिषेक विशालदीप रामटेके (२६) याला मारून जखमी केले. इंदू व विशालदीप रामटेके यांना काठी व विटाने मारून जखमी केले. रामनगर पोलिसांनी या घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ३२४, ३२३, २९४, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलीस नायक पठाण करीत आहेत. तर दुसऱ्या गटातील आदर्श प्रवीण रामटेके (२१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आदर्श हा आई, आजोबा, आजीसह आपल्या घरी शेतीबाबत बोलत असताना आरोपींनी त्यांचे बोलणे आपल्या अंगावर घेऊन फिर्यादीच्या घरासमोर जाऊन गैरकायद्याची मंडळी जमवून काठ्यांनी त्याला मारहाण केली. रामनगर पोलिसांनी या घटनेसंदर्भात भादंविच्या कलम १४३, १४७, १८४, १४९, ३२४, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नायक पठाण करीत आहेत.