‘त्या’ शेतकऱ्यांना फेडरेशनने नुकसान भरपाई द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST2020-02-17T06:00:00+5:302020-02-17T06:00:16+5:30
तालुक्यात एकूण सहा शासकीय धान खरेदी केंद्र आहे. यातील तिगाव धान केंद्रावर मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून शेतकऱ्यांचे धान खरेदी न केल्याने ते केंद्रावर तसेच उघड्यावर पडून होते. केंद्रावरील ग्रेडरने शेतकऱ्यांना अनेक कारणे सांगून अनेकदा परत पाठविले. मात्र शेतकऱ्यांनी आज तरी काटा होईल अशी होती. पण याच दरम्यान अवकाळी पाऊस झाल्याने केंद्रावर असलेले ५० ते ६० शेतकऱ्यांचे धान मोठ्या प्रमाणात भिजले.

‘त्या’ शेतकऱ्यांना फेडरेशनने नुकसान भरपाई द्यावी
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : तालुक्यातील तिगाव येथील शासकीय धान खरेदी केंद्रावर मागील २० ते २५ दिवसांपासून शेतकऱ्यांनी धान विक्रीस आणले आहे. मात्र केंद्रावरील ग्रेडर आणि कर्मचाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे अवकाळी पावसामुळे धान भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून या शेतकऱ्यांना जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यात एकूण सहा शासकीय धान खरेदी केंद्र आहे. यातील तिगाव धान केंद्रावर मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून शेतकऱ्यांचे धान खरेदी न केल्याने ते केंद्रावर तसेच उघड्यावर पडून होते. केंद्रावरील ग्रेडरने शेतकऱ्यांना अनेक कारणे सांगून अनेकदा परत पाठविले. मात्र शेतकऱ्यांनी आज तरी काटा होईल अशी होती. पण याच दरम्यान अवकाळी पाऊस झाल्याने केंद्रावर असलेले ५० ते ६० शेतकऱ्यांचे धान मोठ्या प्रमाणात भिजले. काही शेतकऱ्यांच्या धानाला अंकुर फुटले. शासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला. धान भिजल्यामुळे पाखड झाले असून हा धान खरेदी करण्यास आता केंद्रावरील कर्मचारी नकार देत आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेळकाढू धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसला. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. केंद्रावर पडून असलेल्या धानाचा त्वरीत काटा करावा, अन्यथा या विरोधात केंद्रासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.