शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

वन कार्यालयासमोर कामगारांचे उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST

वन कामगारांच्या मागण्यांकडे शासनाचे वांरवार लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याची शासनाने दखल घेतली नाही. वन कामगारांनी बुधवारपासून राज्यव्यापी धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील वन कामगारांनी युनियनच्या नेतृत्त्वात येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देबारमाही कामगारांना सेवेत सामवून घ्या : वन विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य वन कर्मचारी व वन कामगार युनियनच्या नेतृत्त्वात वन कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन बुधवारपासून (दि.४) येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र वन विभागाने अद्यापही वन कामगारांच्या उपोषणाची दखल घेण्यात आली नाही.वन कामगारांच्या मागण्यांकडे शासनाचे वांरवार लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याची शासनाने दखल घेतली नाही. वन कामगारांनी बुधवारपासून राज्यव्यापी धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील वन कामगारांनी युनियनच्या नेतृत्त्वात येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.योगराज गोंडाणे, भरत बावनथडे, सेवक नागपूरे, सुरज मडावी या वन कामगारांचा यात समावेश आहे. दरवर्षी २४० दिवस आणि चौदा ते पंधरा वर्षे काम केलेल्या बारमाही वन कामगाराला सेवेत सामावून घेण्यात यावे, ६० वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त कामगारांना कामावरुन बंद करुन त्या जागेवर अनुभवी बारमाही बंद केलेल्या कामगारांना घेण्यात यावे.बोगस कामगारांना घेणे बंद करुन अनुभवी कामगारांना घेण्यात यावे, सेवानिवृत्त झालेल्या चौकीदारांच्या जागेवर बारमाही वन कामगारांना घेण्यात यावे, फायर वाचर म्हणून कामगारांना घेण्यात यावे, गोंदिया वन विकास महामंडळातंर्गत हंगामी कामगारांना ६० वर्षांनंतर ईपीएफचे पैसे काढण्याची परवानगी देण्यात यावी.बारमाही कामगारांची कमतरता असून त्यांची भरती करण्यात यावी. एकाच रेंजमध्ये तीन वर्षे झालेल्या गार्ड आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची बदली करण्यात यावी. यासह अन्य मागण्यांना घेऊन वन कामगारांनी उपोषण सुरू केले आहे.याची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विनायक साखरे,भाऊलाल ठाकरे,मनोहर जांभुळकर,शंकर सातार,पद्म घाटघुंबर,धर्मपाल बांबोळे, गालीब शेख, नोवालाल रहांगडाले, भास्कर येल्ले, सेवक नागपूरे, पुरण सेंदरे यांनी दिला आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग