शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीकडे वळण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST2020-03-06T05:00:00+5:302020-03-06T05:00:15+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीच्या डॉ.उषा डोंगरवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच रघुनाथ लांजेवार, प्रगतशील शेतकरी अण्णा पाटील डोंगरवार, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष महादेव बोरकर, डॉ. जी. आर. श्यामकुंवर डॉ. बी. एन. चौधरी, एन. के. कापसे, प्रा. आर. एफ. राऊत उपस्थित होते.शेतकऱ्यांनी एकात्मिक पीक पद्धतीकडे वळावे त्याचप्रमाणे भात पिकाशिवाय नगदी पीक घेण्याकडे वळण्याची गरज असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीकडे वळण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : सध्याची शेती ही परवडण्याजोगी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सामूहिक शेती करण्याची गरज आहे. यामुळे शेतीच्या लागवड खर्चात बचत करणे शक्य होईल.असे प्रतिपादन जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी केले.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी संशोधन केंद्र नवेगावबांधच्यावतीने उन्हाळी भात लागवड तंत्रज्ञान या विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्र म सोमवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीच्या डॉ.उषा डोंगरवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच रघुनाथ लांजेवार, प्रगतशील शेतकरी अण्णा पाटील डोंगरवार, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष महादेव बोरकर, डॉ. जी. आर. श्यामकुंवर डॉ. बी. एन. चौधरी, एन. के. कापसे, प्रा. आर. एफ. राऊत उपस्थित होते.शेतकऱ्यांनी एकात्मिक पीक पद्धतीकडे वळावे त्याचप्रमाणे भात पिकाशिवाय नगदी पीक घेण्याकडे वळण्याची गरज असल्याचे सांगितले.
डॉ. श्यामकुंवर यांनी शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा पॉलिथिन टनेलचा वापर केल्यास धानाचे रोप लवकर लागवडीत येतात. कृषी केंद्रावरून बियाणे न घेता आपल्याच शेतातील बियाणे वापरावेत यामुळे उत्पादन खर्च कमी करता येत असल्याचे सांगितले. डॉ. चौधरी यांनी पिकावर येणाºया किड व रोगांचे नियंत्रण श्री पद्धत व पट्टा पद्धतीचा वापर इत्यादीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी सेंद्रिय व जैविक शेतीकडे वळावे असे सांगितले.उषा डोंगरवार यांनी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून व बीज प्रक्रि या करूनच बियाण्यांची पेरणी करावी असे सांगितले. संचालन निखिल बोकडे यांनी केले तर आभार डॉ.कापसे यांनी मानले.