शेतकऱ्यांनो तुर्तास धान कापणी नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 05:00 IST2020-10-09T05:00:00+5:302020-10-09T05:00:17+5:30
जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. सध्या हलक्या धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. जड धान निसविण्याच्या मार्गावर आहे. जड धानासाठी हा पाऊस अनुकुल मानला जात आहे.मात्र हलक्या धानाची कापणी सुरू असून कापणी केलेला धान तसाच बांध्यामध्ये पडून आहे. त्यामुळे मंगळवार आणि बुधवारी (दि.७) झालेल्या परतीच्या पावसाचा फटका कापणीला केलेल्या धानाला बसला.

शेतकऱ्यांनो तुर्तास धान कापणी नको
लोकमत न्यूज नेटवर्क
गोदिया : जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील हलक्या धानाच्या कापणीला सुरूवात केली आहे. मात्र याच दरम्यान परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने कापणी केलेल्या धानाला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. हवामान विभागाने १४ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा इशारा दिला असून शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी तुर्तास करु नये अशा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. सध्या हलक्या धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. जड धान निसविण्याच्या मार्गावर आहे. जड धानासाठी हा पाऊस अनुकुल मानला जात आहे.मात्र हलक्या धानाची कापणी सुरू असून कापणी केलेला धान तसाच बांध्यामध्ये पडून आहे. त्यामुळे मंगळवार आणि बुधवारी (दि.७) झालेल्या परतीच्या पावसाचा फटका कापणीला केलेल्या धानाला बसला. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
काही शेतकऱ्यांनी हलक्या धानाची मळणी करण्यास सुरूवात केली होती, त्याला सुध्दा पावसाचा फटका बसल्याने धान पाखड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील काही शेतकरी जड धानासह हलका धानाची सुध्दा लागवड करतात. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने या धानाची विक्री करुन शेतकरी दिवाळी सण साजरा करतात.
दिवाळीचा सण एक महिनावर असून यंदा त्यापुर्वीच हलका धान निघाल्याने लगबगीने धानाची कापणी करुन त्याची मळणी करण्यास सुरूवात केली आहे. मात्र यंदा परतीचा पाऊस चांगलाच बरसत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच हवामान विभागाने १४ ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकट टळले नसून त्यांनी वेळीच सावध होत धान कापणी आणि मळणी थांबवावी अशा सूचना कृषी विभागाने केल्या आहेत.
३० हजार हेक्टरला फटका
जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे ३० हजार हेक्टरवरील पिकांना फटका सबला आहे.पाऊस आणि वाऱ्यामुळे शेतातील धानपिक झोपल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांनी नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीला देण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
हवामान विभागाने १४ ऑक्टोबर दरम्यान पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या कालावधी शेतकऱ्यांनी धानाची कापणी आणि मळणी करु नये, तसेच हलक्या धान पिकाचे नुकसान झाले असल्यास त्याची माहिती विमा कंपनीला ७२ तासाच्या आत द्यावी.
- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.