शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 30, 2015 01:05 IST

तिरोडा तालुक्यात मागील महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने उन्हाळी धानाचे मोठे नुकसान झाले.

मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यात मागील महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने उन्हाळी धानाचे मोठे नुकसान झाले. रोगराई धानावर लागली, त्यातच गहू, चना, तूर, पोपट, उडीद, जवस यांची हातात आलेली पिके नष्ट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे सर्वे तलाठी, सचिव व कृषी सहायक यांच्याकडून करण्यात आलेले आहे. या शेतकऱ्यांचे बँकेत खाते नव्हते. अशा शेतकऱ्यांनी बँकेत खाते उघडले व तलाठी तसेच सचिव यांना खाते नंबर दिले. शेतकरी मोठ्या आशेने बँकेत पैसा जमा झाला असेल अशी वाट बघत असतात. पण पैशांचा पत्ताच नाही.सन २०१४ मध्ये एका पाण्यासाठी शेतकऱ्यांचे धान गेले. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची अथवा विद्युत पंपाची व्यवस्था होती, अशा शेतकऱ्यांनी थोडेफार धान पिक घेतले. पण अनेक शेतकरी निसर्गावर अवलंबून असतात त्यांचे काय? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा आहे. जो दिवस असतो तो दिवस शेतकऱ्यांसाठी सारखाच असतो. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ शेतकरी पाहत आहेत. दिवसभर काबाडकष्ट करुन शेतकऱ्यांच्या हातात काहीच मिळत नाही. नेहमीच या पोटासाठी कष्ट करुन उपाशी पोटी शेतकरी जीवन जगत असतो, ही फार दुर्देवी बाब असून मात्र उपाय नाही. शेती हा परवडण्यासाखा व्यवसाय राहिला नाही. पण वडिलांची परंपरा सुरु ठेवावी लागते, असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. रासायनिक खते, औषधे, मजूर यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. पण शेतकऱ्यांनी धान्य कितीही पिकवून त्याच्या मालाला भाव नाही. अशी शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. शेतकरी आपले धान्य वाटेल त्या भावाने विकत असतात. तर व्यापारी कमी दराने धान विकत घेवून शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत असतात. पण खर्चासाठी शेतकऱ्यांना धान विकणे गरजेचे असते. निसर्ग कोपल्यामुळे शेतकरी बैचेन दिसत आहे. पण अशावेळी शेतकऱ्यांचा वाली कोणीही दिसत नाही. (वार्ताहर)