लिंक फेलच्या समस्येने शेतकरी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 22:10 IST2017-09-13T22:10:25+5:302017-09-13T22:10:45+5:30
येथील बँक आॅफ इंडिया शाखेत जुने कर्जधारकांची कर्ज प्रकरण व खाते नंबरसाठी मोठी गर्दी होत आहे.

लिंक फेलच्या समस्येने शेतकरी हैराण
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : येथील बँक आॅफ इंडिया शाखेत जुने कर्जधारकांची कर्ज प्रकरण व खाते नंबरसाठी मोठी गर्दी होत आहे. सामान्य देवाण-घेवाण करणाºया ग्राहकांना त्रास होत असून बँकेत लिंकफेल व खंडित विद्युत पुरवठ्यामुळे कर्मचारी, शेतकरी व ग्राहकांना कमालीचा त्रास होत आहे.
जुने थकीतबाकीदार शेतकरी यांनी आपले कर्ज किती, पासबुक जवळ नाही व खाते नंबरही विसरल्याने त्यांची मोठी पंचाईत होत आहे. शाखा व्यवस्थापक काळसर्पे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, खंडित विद्युत पुरवठा व भारत दुरसंचारची लिंक फेल होत असल्याने तसेच कृषी कर्ज खाते क्रमांक शेतकºयांकडे बरोबर नसल्याने त्रास होत आहे. शेतकरी बँकेत येत आहेत व आम्ही त्यांना सहकार्य करीत आहोत.
शेवटची तारिख १५ सप्टेंबर असल्याने शेतकºयांना त्रास होत आहे. कर्ज प्रकरण नोंदणी करणे शेतकºयांना अनिवार्य आहे. आम्ही सुद्धा शेतकºयांची यादी तयार करणे सुरू केले आहे. पण विद्युतची समस्या असल्याचे त्यांनी सांगितले.
खंडित वीज पुरवठा आणि लिंक फेलच्या समस्येने शेतकºयांसह ग्राहक वैतागले आहे. ही समस्या मार्गी लावण्याची मागणी शेतकºयांनी बँक व्यवस्थापनाकडे केली आहे.