शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१ जागांवर १००० चे मताधिक्य; भाजपाच्या १०७, कोणत्याही क्षणी पारडे फिरणार
2
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: शरद पवार गटाचा 'स्ट्राईक रेट' सगळ्यात भारी; मविआत अव्वल कामगिरी
3
Loksabha Election Result: यशस्वी कामगिरी! मोदी लाटेत ज्या राज्यात उडाला धुव्वा, तिथेच काँग्रेस बनली हिरो
4
Lok Sabha Election Result 2024: श्रीरामाच्या अयोध्येतच भाजपा पिछाडीवर, कमळ कोमेजले, सपाची सायकल सुसाट
5
Nandurbar Lok Sabha Result 2024 : वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला! नंदुरबारमध्ये काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर
6
Sangli Lok Sabha Election Result 2024 :सांगली लोकसभेच्या मैदानात ठाकरेंचा पैलवान ६४ हजार मतांनी पिछाडीवर; विशाल पाटलांनी घेतली आघाडी
7
Mumbai North Lok Sabha Result 2024: उत्तर मुंबईत पीयूष गोयल यांची मोठी आघाडी, तब्बल ७० हजार मतांनी पुढे 
8
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तिकर आघाडीवर, रवींद्र वायकर पिछाडीवर
9
Lok Sabha Election Result Stock Market : २० मिनिटांत २० लाख कोटी स्वाहा, कलांच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स ४००० अंकांनी आपटला
10
Loksabha Election Result 2024 : उलथापालथ होणार का? 'या' ५ राज्यांनी मतमोजणीदरम्यान वाढवलं BJP चं टेन्शन
11
उत्तर प्रदेशनंतर राजस्थानमध्येही भाजपाला धक्का; इंडी आघाडी २५ पैकी १२ जागांवर आघाडीवर
12
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live : बारामती, अमरावतीत महायुतीला धक्का; सुनेत्रा पवार, नवनीत राणा पिछाडीवर
13
Lok Sabha Election Result 2024 Live: NDA-INDIA मध्ये चुरशीची लढत
14
Loksabha Election Result: इंडिया आघाडीचा प्रयोग यशस्वी; काँग्रेसच्या जागांमध्ये 'खटाखट' वाढ
15
Goa Lok Sabha Election Result 2024 श्रीपाद नाईक ४४ हजार मतांनी आघाडीवर, पल्लवी धेंपो पिछाडीवर, भाजपाची धाकधूक वाढली!
16
Lok Sabha Election Result 2024 : आज मिळेल खासदारकी, शपथविधीची जोरदार तयारी सुरू
17
Varanasi, Amethi Lok Sabha Result 2024 : वाराणसीत मोदींनी बाजी पालटली! 9000 मतांनी घेतली आघाडी; स्मृती इराणी पिछाडीवर
18
'वेडात मराठे वीर दौडले सात'चं शूटींग थांबलं! अक्षय कुमार साकारतोय छत्रपती शिवरायांची भूमिका
19
Lok Sabha Election Result 2024 : ४० वर्षांपूर्वी झाले ४०० पार, आज इतिहास घडणार का?
20
Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result: विनायक राऊतांनी नारायण राणेंचे लीड तोडले; 30 मतांनी आघाडीवर

कर्मचाऱ्यांना लागू होणार कुटुंब निवृत्ती वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 6:00 AM

५ सप्टेंबरपासून काळ्या फिती लावून करण्यात आले व ९ सप्टेंबर रोजी एकदिवसीय संप पुकारण्यात आला होता. याची दखल घेत शासनाने मागण्यावर सकारात्मक निर्णय घेत निवृत्ती वेतन लागू करण्याचा निर्णय घेतला असून आचारसंहितेच्या अगोदर शासनादेश काढण्याचे आश्वासन दिले आहे.

ठळक मुद्देवित्त मंत्र्यांसोबत चर्चेतील निर्णय : समन्वय समितीच्या संपाला यश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ९ सप्टेंबर रोजी शासकीय, निमशासकीय, शिक्षक-शिकेत्तर समन्वयक समितीद्वारे एक दिवसीय संप पुकारण्यात आला होता. यावेळी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून सर्व शाळा, कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. या संपाचे फलीत मिळाले असून वित्त राज्य मंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन कपातीवर आधारित अंशदायी पेंशन योजना लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत कर्मचाºयांना जुने निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन, ग्रॅच्युटी, अंशदान उपदान मिळणे बंद झाले आहे. सध्या राज्यात शेकडो मयत कर्मचारी कुटुंबे आहेत. त्यांना यामुळे शासनाकडून कोणताही लाभ मिळत नव्हता. यामुळे ही कुटुंबे उपासमारीचे जीवन जगत होती. कुटुंब व्यवस्थाच उद्ध्वस्त करु पाहणाऱ्या या योजनेविषयी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष होता. मागील काही वर्षात हजारो कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आंदोलने केली जात होती. परंतु शासनाची वेळकाढू व उदासीन भूमिका दिसून येत होती.५ सप्टेंबरपासून काळ्या फिती लावून करण्यात आले व ९ सप्टेंबर रोजी एकदिवसीय संप पुकारण्यात आला होता. याची दखल घेत शासनाने मागण्यावर सकारात्मक निर्णय घेत निवृत्ती वेतन लागू करण्याचा निर्णय घेतला असून आचारसंहितेच्या अगोदर शासनादेश काढण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच इतर सर्व मागण्यांवर बैठका घेत तातडीने सोडवणूक केली जाणार असल्याचे ठरले आहे. संपाचे नेतृत्व महेंद्र चव्हाण, एन.बी. बिसेन, प्रकाश ब्राम्हणकर, सुरेश रहांगडाले, आनंद सोनवाने, जैपाल ठाकुर, कोमल नेवारे, संजय धुर्वे, राम सोनटक्के, रोहित हत्तीमारे, अंजन कावळे, संतोष हंबर्डे, प्रकाश कुंभारे, शांता रहांगडाले, ओमेश्वरी बिसेन, डी.टी. गिऱ्हेपुंजे, अशोक रावते, संतराम जाधव, डिलेश्वर टेंभरे, सुरेश् मुधोळकर, राजेंद्र बोपचे आंिदंनी केले.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन