शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना लागू होणार कुटुंब निवृत्तीवेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 06:00 IST

११ सप्टेंबरला चर्चेसाठी बोलाविले होते. त्यानुसार समन्वय समिती, सर्व प्रधान सचिव आणि वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीचे सर्व लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. वेतनत्रुटी, शिक्षण, आरोग्य, लिपीक संवर्ग, महिला, जि.प.कर्मचारी या मागण्याबाबत संबंधित विभागांशी चर्चा करुन लवकरच बैठक घेऊन तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्याने १३ सप्टेंबरपासून करण्यात येणारा बेमुदत संप मागे घेण्यात आला.

ठळक मुद्देसमन्वय समितीच्या संपाला यश : कर्मचाऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीद्वारे ९ सप्टेंबरला एक दिवसीय संप पुकारण्यात आला होता. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्व शाळा, कार्यालये बंद ठेवण्यात आली होती.याची दखल घेत शासनाने समन्वय समितीला लेखी पत्र देऊन ११ सप्टेंबरला चर्चेसाठी बोलाविले होते. त्यानुसार समन्वय समिती, सर्व प्रधान सचिव आणि वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीचे सर्व लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. वेतनत्रुटी, शिक्षण, आरोग्य, लिपीक संवर्ग, महिला, जि.प.कर्मचारी या मागण्याबाबत संबंधित विभागांशी चर्चा करुन लवकरच बैठक घेऊन तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्याने १३ सप्टेंबरपासून करण्यात येणारा बेमुदत संप मागे घेण्यात आला. १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन कपातीवर आधारीत अंशदायी पेंशन योजना लागू करण्यात आली आहे. याअंतर्गत कर्मचाऱ्यांना जुने निवृत्ती वेतन, कुटूंब निवृत्ती वेतन, ग्रॅच्युटी, अंशदान उपदान मिळणे बंद झाले आहे.सध्या राज्यात शेकडोे मृतक कर्मचाºयांची कुटुंब कठीण परिस्थितीत जीवन जगत आहे. त्यांना यापूर्वी शासनाकडून कुठलाही लाभ मिळत नव्हता. यामुळे ही कुटूंब उपासमारीचे जीवन जगत होती. कुटूंब व्यवस्थाच उद्ध्वस्त करु पाहणाºया या योजनेविषयी कर्मचाºयांमध्ये तीव्र असंतोष होता. ९ सप्टेंबरला एकदिवसीय संप पुकारण्यात आला. याची दखल घेत शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेत कुटूंब निवृत्तीवेतन लागू करण्याचा निर्णय घेतला. आचारसंहितेपूर्वी जीआर काढण्याचे आश्वासन दिले. इतर मागण्यांवर बैठका घेत तातडीने सोडवणूक केली जाणार आहे. महेद्र चव्हाण, एन. बी. बिसेन, प्रकाश ब्राम्हणकर, सुरेश रहांगडाले, आनंद सोनवाने, जैपाल ठाकूर, कोमल नेवारे, संजय धुर्वे, राम सोनटक्के, रोहीत हत्तीमारे, अंजन कावळे, संतोष हंबर्डे, प्रकाश कुंभारे, शांता रहांगडाले, ओमेश्वरी बिसेन, डी.टी.गिऱ्हेपुंजे, अशोक रावते, संतराम जाधव, डिलेश्वर टेंभरे, सुरेश मुधोळकर, राजेंद्र बोपचे पाठपुरावा केला.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन