शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

बनावट दारुच्या कारखान्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST

दारुबंदी असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारुची विक्री केली जात आहे. ही बनावट दारु गोंदिया तालुक्यातील रतनारा येथील एका फार्महाऊसमध्ये आरोपी शाम चाचेरे हरसिंगटोला रतनारा हा तयार करीत होता. गोंदियाच्या शास्त्री वार्डातील विनोद जुलैला यांचे ते फार्महाऊस आहे.

ठळक मुद्दे६ लाख ५८ हजारांचा माल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तस्करीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील रतनारा येथील एका फार्महाऊसमध्ये आरोपी शाम चाचेरे हरसिंगटोला रतनारा हा बनावट दारू तयार करीत होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी धाड टाकून ३ लाख २८ हजार १२० रुपयांची दारु जप्त केली.दारुबंदी असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारुची विक्री केली जात आहे. ही बनावट दारु गोंदिया तालुक्यातील रतनारा येथील एका फार्महाऊसमध्ये आरोपी शाम चाचेरे हरसिंगटोला रतनारा हा तयार करीत होता. गोंदियाच्या शास्त्री वार्डातील विनोद जुलैला यांचे ते फार्महाऊस आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी धाड टाकून ३ लाख २८ हजार १२० रुपये किमतीचे बनावट देशी दारुचे १३२ बॉक्स, २ लाख २५ हजार रुपये किमतीची ७८० लिटर बनावटी देशी दारु तयार करण्याचे केमीकल, बनावट दारुसारखा उग्र येणारा फ्लेवर, मोटार पंप, प्लास्टीक पाईप, मोकड्या बाटल्या, दारुच्या ब्रॅन्डचे झाकन,देशी दारुचे लेबल, दारुच्या बाटल्यांचे झाकन, खरडे, प्लास्टिक चाळणी, अल्पमीटर पाण्याची कॅन, केमीकलचे मोठे ड्रम असा एकूण ६ लाख ५८ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शाम चाचेरे उर्फ पिटी रा.बाजपेई चौक गोंदिया व फार्म हाऊसचा मालक विनोद जुलेल या दोघांवर दवनीवाडा पोलीस ठाण्यात महाराष्टÑ दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम,राजेश बडे, लिलेंद्र बैस,चंद्रकांत करपे, राजकुमार पाचे, रेखलाल गौतम, विनय शेंडे, अजय रहांगडाले यांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदी