बनावट दारुच्या कारखान्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST2019-09-14T06:00:00+5:302019-09-14T06:00:09+5:30
दारुबंदी असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारुची विक्री केली जात आहे. ही बनावट दारु गोंदिया तालुक्यातील रतनारा येथील एका फार्महाऊसमध्ये आरोपी शाम चाचेरे हरसिंगटोला रतनारा हा तयार करीत होता. गोंदियाच्या शास्त्री वार्डातील विनोद जुलैला यांचे ते फार्महाऊस आहे.

बनावट दारुच्या कारखान्यावर धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील रतनारा येथील एका फार्महाऊसमध्ये आरोपी शाम चाचेरे हरसिंगटोला रतनारा हा बनावट दारू तयार करीत होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी धाड टाकून ३ लाख २८ हजार १२० रुपयांची दारु जप्त केली.
दारुबंदी असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारुची विक्री केली जात आहे. ही बनावट दारु गोंदिया तालुक्यातील रतनारा येथील एका फार्महाऊसमध्ये आरोपी शाम चाचेरे हरसिंगटोला रतनारा हा तयार करीत होता. गोंदियाच्या शास्त्री वार्डातील विनोद जुलैला यांचे ते फार्महाऊस आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी धाड टाकून ३ लाख २८ हजार १२० रुपये किमतीचे बनावट देशी दारुचे १३२ बॉक्स, २ लाख २५ हजार रुपये किमतीची ७८० लिटर बनावटी देशी दारु तयार करण्याचे केमीकल, बनावट दारुसारखा उग्र येणारा फ्लेवर, मोटार पंप, प्लास्टीक पाईप, मोकड्या बाटल्या, दारुच्या ब्रॅन्डचे झाकन,देशी दारुचे लेबल, दारुच्या बाटल्यांचे झाकन, खरडे, प्लास्टिक चाळणी, अल्पमीटर पाण्याची कॅन, केमीकलचे मोठे ड्रम असा एकूण ६ लाख ५८ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शाम चाचेरे उर्फ पिटी रा.बाजपेई चौक गोंदिया व फार्म हाऊसचा मालक विनोद जुलेल या दोघांवर दवनीवाडा पोलीस ठाण्यात महाराष्टÑ दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम,राजेश बडे, लिलेंद्र बैस,चंद्रकांत करपे, राजकुमार पाचे, रेखलाल गौतम, विनय शेंडे, अजय रहांगडाले यांनी केली.