शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चेकपोस्टची बनावट पावती पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 9:47 AM

महाराष्ट्र - छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या देवरी (सिरपूर चेक पोस्ट) वर शुक्रवारी (दि.२२) रोजी एका ट्रक चालकाकडून नोव्हेबर व डिसेबर महिन्याची बनावट सी.एफ (केज्युअल शुुुल्क) पावती पकडली.

ठळक मुद्देटोळी गवसण्याची शक्यता लाखों रुपयांच्या महसूलाला फटका

आॅनलाईन लोकमतगोंदिया : महाराष्ट्र - छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या देवरी (सिरपूर चेक पोस्ट) वर शुक्रवारी (दि.२२) रोजी एका ट्रक चालकाकडून नोव्हेबर व डिसेबर महिन्याची बनावट सी.एफ (केज्युअल शुुुल्क) पावती पकडली. यामुळे सीमा तपासणी नाक्यावर खळबळ उडाली असून बनावटी पावती देणारी टोळी सक्रीय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.प्राप्त माहितीनुसार सिरपूर सीमा तपासणी नाक्यावर वाहतूक निरीक्षक आनंद मोड हे वाहन चालकांकडील सी.एफ.पावत्यांची तपासणी करीत होते. या दरम्यान एका ट्रक चालकांने दिलेली पावती पाहुन त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मोड यांनी सदर ट्रक चालकाला पकडून त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. महाराष्ट सरकारला सर्वात जास्त महसूल देणाऱ्या देवरी चेक पोस्टवर दररोज तीन ते चार हजार वाहने ये-जा करतात.वाहतूक निरीक्षकाद्वारे प्रत्येक वाहनाकडून सी.एफ. शुल्क एक हजार रुपये घेवून त्याची पावती दिली जाते. यातून दर महिन्याला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होतो. मागील काही दिवसांपासून बनावट पावती देणारी एक टोळी देवरी येथे सक्रीय असल्याची चर्चा होती. यापूर्वी देखील बनावट पावत्या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

असे फुटले बिंगशुक्रवारी (दि.२२) देवरी चेक पोस्टवर कार्यरत वाहन निरीक्षक आनंद मोड यांनी ट्रक क्र. एमएच १२ एलटी ४१७८ चे कागदपत्रे तपासले असता वाहन चालकाकडे नोव्हेंबर २०१७ ची ०७४२६०४ व डिसेंबर २०१७ ची २३३९५२ क्रमाकांची पावती आढळली. मोड यांनी दोन पावत्यांची नोंद रजिस्टमध्ये शहानिशा केली असता दोन्ही पावत्या बनावट असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही पावत्यांमध्ये एक-एक हजार रुपयाची नोंद असून प्रभारी अधिकारी सीमा तपासणी नाका देवरीचा शिक्का सुद्धा लावलेला आहे.

मागील वर्षी केली होती कारवाईछत्तीसगड व महाराष्ट चेकपोस्टच्या बनावट पावत्या छत्तीसगड पोलिसांनी १२ जुलै २०१६ रोजी सिरपूर बागनदी येथील आरोपींना पकडले होते. त्यावेळी एक टोळी सुध्दा पोलिसांनी पकडली होती. २०१६ मध्ये सुध्दा वाहन निरीक्षक आनंद मोड यांनी ट्रक चालकांकडून बनावट पावत्या पकडल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी (दि.२२) पुन्हा बनावट पावत्या पकडल्या. दरम्यान या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूला बुडत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकार