शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

५४ हजार वीज ग्राहकांकडे १६.५ कोटींची थकबाकी

By admin | Updated: November 10, 2014 22:44 IST

जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी पंपधारक, पाणी पुरवठा योजना, पोल्ट्रीफार्म, ग्रामपंचायत, पब्लिक सर्विसेस व तात्पूरर्त्या स्वरुपाची जोडणी (कनेक्शन) घेणाऱ्या ५३ हजार ९४२ ग्राहकांवर

नरेश रहिले - गोंदियाजिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी पंपधारक, पाणी पुरवठा योजना, पोल्ट्रीफार्म, ग्रामपंचायत, पब्लिक सर्विसेस व तात्पूरर्त्या स्वरुपाची जोडणी (कनेक्शन) घेणाऱ्या ५३ हजार ९४२ ग्राहकांवर १६ कोटी ५ लाख १० हजार रुपयांची विद्युत बिलाची थकबाकी आहे. सर्वाधिक थकबाकी कृषी पंपधारकांवर आहे. आठही तालुक्यात १६ हजार २४५ कृषीपंपधारक ग्राहकांवर ७ कोटी ६३ लाख २१ हजारांची थकबाकी आहे. त्याखालोखाल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिवाबत्तीसाठी वीज जोडणी घेतलेल्या ६९६ ग्राहकांवर ३ कोटी ४२ लाख ७७ हजार रुपये थकबाकी आहे. थकबाकीदार ग्राहकांची संख्या विचारात घेतल्यास सर्वाधिक ग्राहक घरगुती कनेक्शनधारक आहेत. अशा ३२ हजार ९३८ ग्राहकांवर २ कोटी ७२ लाख २२ हजारांची विद्युत थकबाकी आहे. व्यावसायिक ग्राहक असलेल्या २ हजार ७२५ ग्राहकांकडे ८६ लाख ५ हजार रुपयांची थकबाकी आहे. औद्योगिक क्षेत्रातील ५२२ ग्राहकांवर ७८ लाख २५ हजाराची थकबाकी आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व नगर परिषदेअंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा करणाऱ्या विभागाच्या २८८ ग्राहकांवर ३७ लाख ७७ हजार विद्युत बिल थकीत आहे. पोल्ट्रीफार्मसाठी २४ कनेक्शन धारकांवर २ लाख ९७ हजाराची विद्युत थकबाकी आहे. दवाखाने, पोलिस ठाणे व डाकविभाग अशा पब्लिक सर्विसेस असलेल्या ४९० ग्राहकांवर २१ लाख ३६ हजार रुपयांची थकबाकी आहे. तसेच तात्पुरत्या स्वरुपाचे कनेक्शन घेतलेल्या १४ ग्राहकांवर ५० हजार रुपये बिलाची थकबाकी आहे. अधिकृतरित्या वीज कनेक्शन घेवून विद्युत वापरणाऱ्या ग्राहकांनी बील भरण्यास महिनाभर उशीर केला तर त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जातो. मात्र विद्युत कर्मचारी अधिकारी यांच्या डोळ्यासमोर आकडे टाकून विद्युत चोरी होत असल्याचे चित्र आहे.