शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांचा आढावा सभेवर बहिष्कार

By admin | Updated: February 3, 2015 22:58 IST

सालेकसा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक अनंतवार यांचा प्रभार काढून घेण्याविषयी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व आरोग्य संचालक मुंबई व उपसंचालक

गोंदिया : सालेकसा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक अनंतवार यांचा प्रभार काढून घेण्याविषयी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व आरोग्य संचालक मुंबई व उपसंचालक नागपूर यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप त्यांचा प्रभार काढण्यात न आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी ३० जानेवारीच्या आढावा सभेवर बहिष्कार घातला.निवेदनानुसार, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनंतवार यांची बिजेपार, सातगाव व दर्रेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी १० आॅक्टोबर २०१४ रोजी तक्रार केली होती. यानंतर ८ डिसेंबर २०१४ रोजी त्यांचा पदभार काढून त्यांची त्वरित बदली करण्याची मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना केली होती. मात्र त्यांचा पदभार काढण्यात न आल्याने ३० जानेवारीच्या आढावा सभेवर बहिष्कार घालण्यात आला. तसेच जोपर्यंत डॉ. अनंतवार अतिरीक्त कार्यभार काढण्यात येत नाही, तोपर्यंत आढावा सभेवर बहिष्कार असेल, असे बिजेपार, सातगाव व दर्रेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कर्मचाऱ्यांनी कळविले आहे. तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीसुद्धा अनंतवार यांची तक्रार केली होती. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी व अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी हे डॉ. अनंतवार यांचा बचाव करीत असल्याचा आरोपही सदर कर्मचाऱ्यांनी केला आहे. डॉ. विवेक अनंतवार यांचा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा पदभार त्वरित काढून दुसऱ्या अधिकाऱ्यांना पदभार सोपविण्यात यावे, अशी मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)