कोविन ॲपमध्ये एरर...लसीकरणात अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:26 AM2021-01-18T04:26:57+5:302021-01-18T04:26:57+5:30

गोंदिया : देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेला शनिवारपासून संपूर्ण देशभरात प्रारंभ झाला. लॉचिंग ड्राईव्हच्या लसीकरणाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. मात्र ...

Error in Covin app ... Vaccination interruption | कोविन ॲपमध्ये एरर...लसीकरणात अडथळा

कोविन ॲपमध्ये एरर...लसीकरणात अडथळा

Next

गोंदिया : देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेला शनिवारपासून संपूर्ण देशभरात प्रारंभ झाला. लॉचिंग ड्राईव्हच्या लसीकरणाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. मात्र यासाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड आल्याने तुर्तास ही लसीकरण मोहीम पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचे आदेश आरोग्य संचालक कार्यालयाकडून जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाले आहे.

कोविड लसीकरणाच्या लाॅचिंग ड्राईव्ह अंतर्गत पहिल्या टप्प्यात फ्रंट लाईन योद्धयांना लसीकरण केले जात आहे. शनिवारी देशभरात सर्वत्र लसीकरण मोहिमेला उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी गोंदिया जिल्ह्यातील तीन केंद्रावरुन २१३ कोरोना योद्धयांना लसीकरण करण्यात आले. आरोग्य विभागाने या प्रत्येक केंद्रावरुन १०० कोरोना योद्धयांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र कोविन ॲपमध्ये एरर आल्याने लसीकरणासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. ही समस्या सर्वत्र आली आहे. त्यामुळे आरोग्य संचालक कार्यालयाने या संदर्भातील सूचना सर्व जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या आहे. पुढील आदेशापर्यंत ही मोहीम स्थगित करावी असा संदेश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे मंगळवारी होणारे लसीकरण पुढे जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्स डॉ.अमरीश मोहबे यांना विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. कोविन सॉफ्टवेअरमध्ये बिघाड आल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. हा अडथळा दूर करण्याचे काम सध्या सुरु असल्याचे सांगितले.

.......

लसीकरणासाठी वाढणार नाही केंद्राची संख्या

कोविड लसीकरणाचा प्रोग्राम हा बऱ्याच प्रमाणात ऑनलाईन प्रक्रियेवर अवलंबून आहे. यात कधी इंटरनेट तर कधी साॅफ्टवेअरमध्ये बिघाड येत असल्याने लसीकरण केंद्राची संख्या वाढविल्यास ही समस्या आणखी वाढू शकते. त्यामुळे आता जिल्ह्यात तीनच लसीकरण केंद्र राहणार आहे. पहिल्या टप्प्यात गोंदिया, तिरोडा, देवरी आणि दुसऱ्या टप्प्यात अर्जुनी मोरगाव, गोरेगाव, सडक अर्जुनी आणि त्यानंतर उर्वरित तालुक्यात लसीकरण केले जाणार आहे.

......

लसीकरण मोहिमेमुळे उत्साह

कोविड संक्रमणाच्या काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता चाेवीस तास रुग्ण सेवा केली . त्यामुळे लसीकरणाचा पहिला बहुमान सुद्धा त्यांनाच देण्यात आला. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह असून लसीकरणास आरंभ झाल्याने सर्वसामान्यांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: Error in Covin app ... Vaccination interruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.