रोजगार सेवकाने केली ५०० रूपयांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:01:05+5:30

रोजगार सेवक किशोर शेंडे हा त्यांच्या घरी गेला. त्याने तक्रारदारास घरकुल व बँक खात्या संबंधीत कागदपत्र आणून देण्यास सांगत मजुरांच्या मजुरीचे पैसे काढून देण्यासाठी ५०० रूपयांची मागणी केली. यावर तक्रारदारांनी २९ जानेवारी २०२० रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली.

Employment servant demanded Rs. 500 | रोजगार सेवकाने केली ५०० रूपयांची मागणी

रोजगार सेवकाने केली ५०० रूपयांची मागणी

ठळक मुद्देग्राम चारगाव येथील प्रकरण : बांधकाम मजुरांचे पैसे देण्यासाठी मागितले

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : घरकुल बांधकाम करणाऱ्या मजुरांचे मजुरी काढण्याचे काम करुन देण्यासाठी ५०० रूपयांची मागणी करणाऱ्या रोजगार सेवकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे. सोमवारी (दि.२०) ही कारवाई करण्यात आली असून किशोर शेंडे असे लाचखोर रोजगार सेवकाचे नाव आहे.
तक्रारदार या मजूर असून त्यांच्या वडिलांच्या नावाने सन २०१८-१९ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. यासाठी त्यांना २० हजार रूपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे.
अशात २८ जानेवारी रोजी रोजगार सेवक किशोर शेंडे हा त्यांच्या घरी गेला. त्याने तक्रारदारास घरकुल व बँक खात्या संबंधीत कागदपत्र आणून देण्यास सांगत मजुरांच्या मजुरीचे पैसे काढून देण्यासाठी ५०० रूपयांची मागणी केली. यावर तक्रारदारांनी २९ जानेवारी २०२० रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली.
तक्रारीच्या आधारे पथकाने ३० जानेवारी रोजी पडताळणी केली असता रोजगारसेवक शेंडे याने पंचांसमक्ष पुन्हा तक्रारदारास ५०० रूपयांची मागणी केली. प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.२०) शेंडे यांच्यावर रावणवाडी पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७ (सुधारित अधिनियम २०१८) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Employment servant demanded Rs. 500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.